Home /News /entertainment /

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या मंचावर दीपा-कार्तिकची झाली पोलखोल

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या मंचावर दीपा-कार्तिकची झाली पोलखोल

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. छोट्या उस्तादांचा आत्मविश्वास आणि उत्साह जजेसनाही थक्क करुन टाकतो आहे.

  मुंबई, 14 डिसेंबर : स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद (maharashtracha superstar)कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. छोट्या उस्तादांचा आत्मविश्वास आणि उत्साह जजेसनाही थक्क करुन टाकतो आहे. बच्चेकंपनीच्या या सुरेल मैफलीत आनंदाचे रंग भरण्यासाठीहजेरी लावली. ती रंग माझा वेगळ्या मालिकेतील दीपा-कार्तिक (deepa and kartik )आणि चिमुकल्या दीपिका आणि कार्तिकीने. या खास पाहुण्यांच्या हजेरीने सेटवरही नवा उत्साह संचारला होता. या धमाल एपिसोडमध्ये दीपिका आणि कार्तिकीने सेटवरचे काही भन्नाट किस्से शेअर केले. दीपा आणि कार्तिक यांच्यामध्ये सेटवर सर्वात उशिरा कोण येतं? सर्वात जास्त रिटेक कोण घेतं? सेटवर सर्वात जास्त फोनमध्ये कोण गुंग असतं अशा अनेक गोष्टींचं पोलखोल करत त्यांनी सेटवर धमाल उडवून दिली. सेटवर पडद्यामागे नेमकं काय घडतं हे जाणून घ्यायची प्रत्येकालाच उत्सुकता असते. त्यामुळे दीपिका-कार्तिकीसोबतचा हा खेळ सर्वांनीच मनापासून एन्जॉय केला. वाचा : किती ते प्रेम! मुंबईत येताच विकीने पत्नी कतरिनासाठी काय केलं पाहिलंत का? स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळत आहेत. तसेच या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अखेर दीपा आणि कार्तिक ६ वर्षानंतर समोरासमोर येणार आहेत. तेदेखील कोर्टात. ,कार्तिकपासून घटस्फोट घेण्यास दीपाने नकार दिला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे ही जोडी एकत्र येणार का याची उत्सुकता लागली आहे. वाचा : Video : साराच्या 'चकाचक' गाण्यावर अमृता खानविलकरचा ढिंच्याक स्वॅग दीपा म्हणजे रेश्मा शिंदे  सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती दीपिका आणि कार्तिकीसोबतचे काही भन्नाट व्हिडिओ शेअर करत असते. चाहत्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असतो.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  या खास भागाची झलक येत्या शनिवारी म्हणजेच 18 आणि 19 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद दर शनिवार आणि रविवारी रात्री 9वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या