त्या रात्री नेमकं काय झालं? अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यूचं न उलगडलेलं कोडं

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दिव्या भारतीचा आज वाढदिवस आहे. वयाच्या 19 व्या वर्षी मुंबईतील वर्सोवा याठिकाणी असणाऱ्या तिच्या घराच्या बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाला होता.

  • Share this:

दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर स्टारडस्ट मासिकाचे पत्रकार ट्रॉय रिबेरियो यांनी लिहिलेल्या एका लेखानुसार, दिव्या, फॅशन डिझायनर नीता लुल्ला आणि तिचे पती डॉ. श्याम लुल्ला त्या रात्री दिव्याच्या घरी होते. दिव्याने प्रचंड दारू प्यायली होती. नेहमीप्रमाणेच बाल्कनीत दिव्या बसली होती पण दारूच्या नशेत असल्याने तिचा तोल गेला आणि ती बाल्कनीतून खाली पडली.

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारतीचा वयाच्या १९व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या मृत्यूचं कोडं उलगडलंच नाही. दिव्याला लुल्ला आणि बिल्डिंगमध्ये राहाणाऱ्या दिग्दर्शक व्ही मेनन यांनी कूपर रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्यात अपयश आलं

दिव्याच्या निधनाबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. आत्महत्या की हत्या असे अनेक प्रश्न त्यानंतर उपस्थित केले गेले. पण पुराव्याअभावी दिव्याच्या मृत्यूची फाइल पोलिसांनी बंद केली. दिव्याच्या मृत्यूबाबत तिच्या आईलाही जबाबदार धरण्यात आलं होतं. मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाजवळ बसून तिचे वडील लहान मुलाप्रमाणे रडले होते. दिव्या आणि तिचा भाऊ कुणाल यांचं नातं देखील अगदी जवळचं होतं

दिव्याच्या मृत्यूनंतर तिच्या हत्येचा संशय तिचा पती साजिद नाडियाडवालावर देखील घेण्यात आला होता. ज्यादिवशी तिचा मृत्यू झाला त्यावेळी दिव्या दारूच्या नशेत होती.

आज दिव्याचा वाढदिवस असून कमी वयात हरहुन्नरी कलाकार गमावल्याचं दु:ख बॉलीवूडला नेहमी आहे.

दिव्याने कमी वयातसुद्धा बॉलिवूडवर राज्य केलं. तिच्या निधनाला अनेक वर्षं होऊनही तिची लोकप्रियता आजही तितकीच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2020 09:22 PM IST

ताज्या बातम्या