सुपरस्टार पवन कल्याणच्या वाढदिवसाची तयारी करताना दुर्घटना, तिघांचा मृत्यू

सुपरस्टार पवन कल्याणच्या वाढदिवसाची तयारी करताना दुर्घटना, तिघांचा मृत्यू

सुपरस्टार पवन कल्याणचे काही चाहते त्याचा 40 फूट उंच असणारा कटआउट लावत होते. त्यावेळी तिघेजण हाय होल्टेज तारेच्या संपर्कात आले आणि यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे.

  • Share this:

हैदराबाद, 02 सप्टेंबर : तेलुगू सिनेमातील सुपरस्टार पवन कल्याण (Telugu superstar Pawan Kalyan birthday)चा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारी दरम्यान एक अपघात घडला आहे. 2 सप्टेंबर रोजी पवन कल्याणचा वाढदिवस असतो. त्याचे चाहते देखील खूप उत्साहात त्याचा वाढदिवस साजरा करतात. यावर्षी देखील त्याच्या काही चाहत्यांनी पवन कल्याणच्या वाढदिवसाची तयारी केली होती.

दरम्यान पवन कल्याणचे काही चाहते त्याचा 40 फूट उंच असणारा कटआउट लावत होते. त्यावेळी तिघेजण हाय होल्टेज तारेच्या संपर्कात आले आणि यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे. या तिघांना वाचवण्यासाठी गेलेले आणखी तिघेजण देखील अत्यवस्थ आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

(हे वाचा-'रणबीर-रणवीरने ड्रग टेस्ट करावी', हे कलाकार अ‍ॅडिक्ट असल्याचा कंगनाचा आरोप)

पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, 1 सप्टेंबरच्या रात्री साधारण साडेवाठ वाजण्याच्या सुमारास आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. कटआउटचा लोखंडाच्या रेलिंगला स्पर्श झाला आणि तार त्याला चिकटली. पवन कल्याणने यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे की मृत परिवाराची जबाबदारी तो घेणार आहे. त्याने पीडितांच्या कुटुंबीयांना 2-2 लाखाची मदत जाहीर केली आहे. दरम्यान टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेनंतर दु:ख व्यक्त केले आहे. बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी ट्वीट करून मृतांच्या कुटुंबीयांना 2-2 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले आहे.

पवन कल्याण तेलुगू सिनेमातील असा चेहरा आहे की ज्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याने थोलिप्रेमा आणि तम्मुडू यांसारख्या चित्रपटातून त्याचे अभिनयाचे कसब सिद्ध केले आहे. पवन कल्याणने हे सिद्ध केले आहे की, तो केवळ एका मोठ्या सुपरस्टारचा भाऊ नसून स्वत: एक सुपरस्टार आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 2, 2020, 4:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading