स्मृतिदिनानिमित्त स्मिता पाटील यांना आदरांजली

स्मृतिदिनानिमित्त स्मिता पाटील यांना आदरांजली

सिनेसृष्टीतल्या सगळ्या नट्यांपेक्षा सगळ्यात वेगळी दिसणारी आणि आपली एक वेगळी छबी असणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील.

  • Share this:

13 डिसेंबर : पाणीदार डोळे आणि निरागस सौंदर्यानं परिपूर्ण असलेली अजरामर अभिनेत्री स्मिता पाटील. आजच्या दिवशी त्यांनी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. 1986मध्ये त्या हे जग सोडून गेल्या. सिनेसृष्टीतल्या सगळ्या नट्यांपेक्षा सगळ्यात वेगळी दिसणारी आणि आपली एक वेगळी छबी असणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील.

स्मिता पाटील या राजकीय वारसा असलेल्या घरात जन्मल्या पण त्यांना आवड मात्र अभिनयाची होती. सगळ्या अभिनेत्रींमध्ये त्या वेगळ्या दिसायच्या, वागायच्याही वेगळ्या आणि त्यामुळे असेल कदाचित त्यांचे सिनेमेही सगळ्यात वेगळे आणि हटके असायचे.

स्मिता पाटील यांच्या आईने त्यांना नेहमी अधिकारांसाठी लढायला शिकवलं. याचाच प्रभाव कुठेतरी त्यांच्या सिनेमावर पडला. सिनेमासोबत आपल्या सामाजिक जाणिवाही त्यांनी नेहमी जागृत ठेवल्या. पुण्यातल्या खासदार शिवाजीराव पाटील यांच्या घरात जन्मलेल्या स्मिताताई 1970मध्ये पहिल्यांदा दूरदर्शनवर बातम्या वाचताना दिसल्या. याच दरम्यान, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या त्या नजरेस पडल्या. त्यांच्या अभिनयाची आणि त्यांच्या वेगळेपणाची जादू बेनेगल यांच्यावरही पडली आणि त्यांनी स्मिता यांना सिनेमात काम करण्याची संधी दिली.

'अर्थ', 'भूमिका', 'मंडी' अशा समांतर सिनेमात त्यांनी उत्तम कामगिरी करत सगळ्यांची मन जिकंली. 'उंबरठा', 'जैत रे जैत' या मराठी सिनेमांत तर त्यांनी त्यांची एक वेळगीच छाप चाहत्यांसमोर ठेवली. त्यांच्या या अप्रतिम अभिनयामुळे त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यातही आलं.

सिनेसृष्टीचा असा यशस्वी प्रवास करताना त्यांनी व्यावसायिक सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. राज खोसला यांच्या 'नमक हलाल' या सिनेमात त्यांचं अमिताभ बच्चनसोबतचं 'आज रपट जाएं तो' हे लोकप्रिय गाणं आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे.

राज बब्बर यांच्या येण्यानं त्यांचं आयुष्यच बदललं. स्मिता यांच्या 'अदां'वर राज बब्बर विवाहित असूनही 'फिदा' झाले. स्मिता पाटीलही त्यांच्या प्रेमात अवघ्या बुडाल्या होत्या.

राज यांनी स्मिता यांच्या प्रेमासाठी त्यांची पत्नी नादिरा बब्बर यांना सोडून दिले. त्यावेळेस स्मिता आणि राज यांचं लग्न हे त्यांच्या चाहत्यांसाठी आणि मीडियासाठी धक्कादायक होतं. याच निर्णयामुळे, स्मिता आणि राज यांना त्यांच्या चाहत्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं.

पण तरीही त्यांच्या दर्जेदार अभिनयाने आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे त्या आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या भूमिकांमुळे त्या अजरामरच राहिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 01:50 PM IST

ताज्या बातम्या