मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दे धक्का 2:अखेर तारीख ठरली! या दिवशी चित्रपट येणार भेटीला

दे धक्का 2:अखेर तारीख ठरली! या दिवशी चित्रपट येणार भेटीला

मराठीतील विनोदाचा धमाका असलेला 'दे धक्का' (De Dhakka) चित्रपट सर्वांचाच आवडता आहे. अभिनेता शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे यांच्या उत्कृष्ट अभिनयाने या चित्रपटात चार चाँद लावले होते.

मुंबई, 30सप्टेंबर- मराठीतील विनोदाचा धमाका असलेला 'दे धक्का' (De Dhakka) चित्रपट सर्वांचाच आवडता आहे. अभिनेता शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे यांच्या उत्कृष्ट अभिनयाने या चित्रपटात चार चाँद लावले होते. या चित्रपटाने रसिकांचं मन जिंकलं होतं. या चित्रपटाच्या उस्फुर्त यशानंतर आत्ता याचा २ भागसुद्धा(De Dhakka 2) आपल्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली आहे.

नुकताच निर्माते अमेय खोपकर 'यांनी दे धक्का २' च्या प्रदर्शनची तारीख जाहीर करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे, येत्या १ जानेवारी २०२२ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. अमेय खोपकर यांनी ट्विट करत लिहिलं आहे, 'दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस महेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का २ तारीख ठरली!!!१ जानेवारी २०२२

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय'. असं म्हणत सर्वांनाच मनोरंजनाची मेजवानी दिली आहे.

प्रदर्शनाची तारीख समोर येताच चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. 'दे धक्का' या चित्रपटाने रसिक प्रेक्षकांना हसवून लोटपोट केलं होतं. २००८ मध्ये 'दे धक्का' हा चित्रपट आपल्या भेटीला आला होता. या चित्रपटाची कथा हॉलिवूड चित्रपट ' लिटिल मिस सनशाईन' या चित्रपटावर आधारित आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरणारी ही कथा आहे. यामध्ये सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, साक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातील शुक्राची चाँदनी, दे धक्का अशी गाणीसुद्धा पसंत करण्यात आली होती.

(हे वाचा:छोट्या कार्तिकीची सोशल मीडियावरही हवा! 'रंग माझा वेगळा'तील ही चिमुकली आहे तरी...)

या सर्व यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग आपल्या भेटीला येणार आहे. 'दे धक्का ' चित्रपटातील सर्व कलाकार 'दे धक्का २' मध्येही दिसून येणार आहेत. यावेळी कथा लंडनमध्ये घडताना दिसून येणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटासाठी फारच उत्सुक झाले आहेत.

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment