मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'या' कारणामुळे DDLJ च्या क्लायमॅक्समधून गायब होत्या हिमानी शिवपुरी; ऐकून तुम्हालाही कोसळेल रडू

'या' कारणामुळे DDLJ च्या क्लायमॅक्समधून गायब होत्या हिमानी शिवपुरी; ऐकून तुम्हालाही कोसळेल रडू

हिमानी शिवपुरी या एनएसडीतून शिकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर टीव्ही आणि चित्रपटांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. 1995 मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि काजोल (Kajol) अभिनित 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटात त्यांनी काजोलची आत्ती कम्मोची भूमिका केली होती.

पुढे वाचा ...

  मुंबई, 6 नोव्हेंबर- भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या चित्रपटांमध्ये DDLJ म्हणजेच दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे या हिंदी चित्रपटाचा मोठा वाटा आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड केले आणि शाहरूख खान आणि काजोल यांना एक वेगळीच उंची गाठून दिली. ही रोमँटिक फिल्म अजूनही त्या पिढीतील लोक आवर्जून पाहतात. मुंबईतल्या थिएटरमध्ये तर अनेक वर्षं DDLJ हा चित्रपट दाखवला जात होता. असा हा चित्रपट सर्वांच्याच मनात घर करून राहिला आहे. यामध्ये अभिनेत्री हिमानी शिवपुरी (Himani Shivpuri) यांची महत्त्वाची भूमिका होती पण क्लायमॅक्स सीनमध्ये त्या उपस्थित नव्हत्या. याबद्दल नवभारत टाइम्सने एक वृत्त दिलं आहे.

  हिमानी शिवपुरी या एनएसडीतून शिकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर टीव्ही आणि चित्रपटांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. 1995 मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि काजोल (Kajol) अभिनित 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटात त्यांनी काजोलची काकू कम्मोची भूमिका केली होती. त्यांचा अभिनय सर्वांना खूप आवडलाही होता आणि लक्षातही राहिला होता.

  " isDesktop="true" id="627454" >

  पण संपूर्ण चित्रपटात दिसणाऱ्या हिमानी क्लायमॅक्स म्हणजे शेवटच्या अतिमहत्त्वाच्या सीनमध्ये स्क्रीनवर दिसल्या नाहीत. त्यामुळे चाहत्यांच्या मनात हा प्रश्न होताच की इतकी महत्त्वाची त्या कुटुंबातील व्यक्ती शेवटच्या सीनमध्ये कशी नव्हती. त्याबाबत हिमानी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये खुलासा केला होता. या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना त्यांच्या पतीचं निधन झालं होतं त्यामुळे त्या क्लायमॅक्स सीनमध्ये दिसल्या नाहीत.आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात हिमान शिवपुरी आणि अनुपम खेर यांचं रोमँटिक कनेक्शन दाखवलं होतं. चित्रपटात अनुपम खेर यांना शाहरूखच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

  एका मुलाखतीत हिमानी शिवपुरी म्हणाल्या होत्या, ‘ दिलवालेच्या क्लायमॅक्स सीनमध्ये नव्हती अशी मी एकमेव कलाकार होते. त्यावेळी माझ्या पतीचं निधन झालं होतं त्यामुळे मला तिथं थांबणं शक्य नव्हतं. मी एका वेगळ्या मनस्थितीत होते. एका अनोळखी शहरात मी एकटीच पतीच्या अंत्यसंस्कारांची तयारी करत होते. त्यानंतर त्यांच्या अस्थि घेऊन हरिद्वारला घेऊन जात होते. चित्रपटात माझे आणि अनुपम खेर यांचं सीन होते. यशराजच्या युनिटने प्रसंगावधान राखत समजुतदारपणा दाखवला.

  (हे वाचा:विकी कौशलच्या आईनं कतरिनासाठी पाठवली दिवाळीची भेट? या खास वस्तूंचा होता समावेश)

  ‘मी दिल्लीत रंगभूमीवर काम करणाऱ्या शाहरुखला ओळखत होते. एनएसडीचे अनुपम खेर यांना मी ओळखत होते. आम्ही सगळे एकत्र जेवायचो, गप्पा मारायचो आणि मनापासून काम करायचो. तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की तो चित्रपट मैलाचा दगड ठरेल. चित्रपटाचं स्क्रिप्ट, टेकिंग, गाणी सगळंच उत्तम झालं होतं आणि जणू तो सुपरडूपर हिट झाला जणू जादूच झाली,’असंही हिमानी यांनी दुसऱ्या मुलाखतीत या चित्रपटाबद्दल सांगितलं होतं.या चित्रपटात शाहरुख, काजोल, अनुपम, शिवानी यांच्याशिवाय अमरीश पुरी, फरिदा जलाल, मंदिरा बेदी, सतीश शहासोबतच अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगेचं नाव सुवर्णाक्षरांत लिहिलं गेलं. आतापर्यत दीर्घकाळ थिएटरमध्ये शो दाखवले जाणारा हा एकमेव चित्रपट ठरला.

  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment