मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘तू काहीही म्हण अभिनेता दोषीच’; एकताचा दावा DCP पाटील यांनी फेटाळला

‘तू काहीही म्हण अभिनेता दोषीच’; एकताचा दावा DCP पाटील यांनी फेटाळला

एकता कपूरनं घेतली होती बलात्कार प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्याची बाजू; DCP पाटील यांनी फेटाळले सेलिब्रिटींचे दावे, अभिनेत्याविरोधात आहेत सबळ पुरावे...

    मुंबई 6 जून: एकता कपूरच्या (Ekta Kapoor) नागिण मालिकेतील अभिनेता पर्ल व्ही पुरी (Pearl V Puri) याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. परंतु हे आरोप एकतानं फेटाळले होते. तिनं अभिनेत्याची बाजू घेत विनाकारण खोट्या प्रकरणात त्याला अडकवलं जातंय असे उलट आरोप त्या मुलीच्या वडिलांवर केले. (Pearl V Puri rep case) मात्र एकताचा हा दावा डीसीपी संजय कुमार पाटील यांनी फेटाळून लावला आहे. त्यांनी एकताला प्रत्युत्तर देत अभिनेत्याविरोधात ठोस पुरावा असल्याचा उलट दावा केला आहे. वृत्तमाध्यमांशी बोलताना डीसीपी म्हणाले, “ही केस सर्वप्रथम वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तिथून आता वालिव पोलीस ठाण्यात ट्रान्सफर करण्यात आली आहे. आरोपीचं निवेदन घेण्यात आलं आहे. आरोपी आणि पिडीत मुलीची आई एकाच शोमध्ये काम करत होते. त्या मुलीचं वय 12 वर्ष आहे. एकतानं केलेल्या दाव्यात तथ्य नाही. आमच्याकडे अभिनेत्याविरोधात ठोस पुरावे आहेत. हे सर्व पुरावे आम्ही लवकरच कोर्टात सादर करु. सध्या या प्रकरणावर आणखी चौकशी सुरु आहे.” ‘मार खाणाऱ्या निशानं कॅमेरे बंद का केले?’ करणचा घटस्फोटित पत्नीला सवाल बलात्कार प्रकरणात निया शर्माने दिला पर्ल व्ही. पुरीला पाठींबा यापूर्वी काय म्हणाली होती एकता कपूर? “मुलींची छेडछाड करणाऱ्या किंवा त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या कलाकाराला माझ्या मालिकांमध्ये स्थान मिळत नाही. पण पर्ल मात्र निर्दोष आहे. त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहे. माझं कालंच त्या मुलीच्या आईशी बोलणं झालं. तिनं मला स्पष्ट शब्दात सांगितलं की मुलीचे वडिलचं अभिनेत्यावर खोटे आरोप करत आहेत. त्याला अटक व्हावी म्हणून त्यांनी एक बनावटी कथा रचली आहे.” अशा आशयाची पोस्ट एकतानं केली होती. लक्षवेधी बाब म्हणजे तरुणीच्या आईसोबत केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील एकताकडे आहे. अन् पुरावा म्हणून ती पोलिसांना देऊ शकते असा दावा तिनं केला होता. मात्र तिचा हा दावा आता डीसीपी पाटील यांनी फेटाळून लावला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Crime, Ekta kapoor, Tv actor

    पुढील बातम्या