Home /News /entertainment /

TVFची Aspirants अडकली वादाच्या भोवऱ्यात; नामांकित लेखकानं केला कथाचोरीचा आरोप

TVFची Aspirants अडकली वादाच्या भोवऱ्यात; नामांकित लेखकानं केला कथाचोरीचा आरोप

‘माझ्या या पुस्तकातील कथा हुबेहुब चोरली’; नामांकित लेखकानं TVF विरोधात केली कायदेशीर तक्रार

    मुंबई 22 मे: नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार, अल्ट बालाजी या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मच्या गर्दीत TVF नं देखील स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ‘एस्पिरेंट्स’ (Aspirants) ही वेब सीरिज सध्या भरपुर चर्चेत आहे. तरुणांमध्ये या सीरिजबाबत एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र लोकप्रियतेचे जुने विक्रम मोडण्याआधीच ही सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एका नामांकित लेखकानं TVF वर पटकथा चोरीचा आरोप केला आहे. शिवाय कायदेशीर कारवाईचा इशारा देखील दिला आहे. (take legal action) नेमकं हे प्रकरण आहे काय? प्रसिद्ध लेखक नीलोत्पल मृणाल यानं (Nilotpal Mrinal) TVFच्या ‘एस्पिरेंट्स’ या सीरिजवर पटकथा चोरीचा आरोप केला आहे. त्याच्या ‘डार्क हॉर्स’ (Dark Horse) या पुस्तकात त्यानं ही स्टोरी लिहिली होती. सीरिजची निर्मिती करताना त्यांनी कुठलंही क्रेडिट न देता या पटकथेचा वापर केला असा आरोप नीलोत्पलनं केला आहे. याबाबात अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी त्यानं फेसबुकवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. '2 महिन्याच्या बाळाला हवंय आईचं दूध'; भूमी पेडणेकरचं भावनिक आवाहन या पोस्टमध्ये तो म्हणाला, “एस्पिरेंट्सची निर्मिती अरुणभ कुमार यानं केली आहे. मात्र सीरिज निर्माण करण्यापूर्वी मी त्याची भेट घेतली होती. मी त्याला माझ्या डार्क हॉर्स या पुस्तकाबद्दलही सांगितलं होतं. या पुस्तकातील कथेवर एखाद्या सीरिजची निर्मिती केली जाऊ शकते असं मी त्याला सुचवलं होतं. अन् त्यानंतर आता ही सीरिज मी पाहिली. ही हुबेहुब माझ्या पुस्तकावरुन कॉपी करण्यात आली असून मला कुठलंही क्रेडिट दिलं गेलेलं नाही. शिवाय याबाबत मी निर्मात्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी साधा संवाद करण्यासही नकार दिला आहे. त्यामुळं आता मी कॉपी राईट कायद्याअंतर्गत कायदेशीर तक्रार करणार आहे.” डार्क हॉर्स हे पुस्तक 2016 मध्ये प्रचंड गाजलं होतं. या पुस्तकासाठी नीलोत्पल मृणाल याला साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला होता.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Web series

    पुढील बातम्या