मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नातं जोडलं अनेकांशी पण अखेर राहिली एकटी; पाहा परवीन बाबीची Love Tragedy

नातं जोडलं अनेकांशी पण अखेर राहिली एकटी; पाहा परवीन बाबीची Love Tragedy

परवीन बाबीची Love Tragedy; डॅनी ते महेश भट्ट, अनेकांशी केलं अफेअर पण अखेर राहिली एकटी!

परवीन बाबीची Love Tragedy; डॅनी ते महेश भट्ट, अनेकांशी केलं अफेअर पण अखेर राहिली एकटी!

परवीन बाबीची Love Tragedy; डॅनी ते महेश भट्ट, अनेकांशी केलं अफेअर पण अखेर राहिली एकटी!

मुंबई 4 एप्रिल: परवीन बाबी (Parveen Babi) ही 80 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री होती. आपल्या मादक सौंदर्यानं प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीनं अमर अकबर अँथनी, नमक हलाल, शान, दीवार, कालिया यांसारख्या सुपरहिट चित्रपटांची अक्षरश: रांग लावली होती. परवीन बाबी आणि सुपरहिट चित्रपट असं जणू समिकरणच झालं होतं. त्यामुळं तिनं चित्रपटात काम करावं यासाठी निर्मात्यांनी तिच्या घरासमोर जणू रांगच लागत असे. परंतु करिअरमध्ये यशाचं शिखर गाठणारी परवीन वैयक्तिक आयुष्यात मात्र अपयशी ठरली. तब्बल चार वर्ष ती अभिनेते डॅनींसोबत (Danny Denzongpa) राहात होती परंतु तिला संसाराचं सुख काही मिळालं नाही. आज परवीनचा 72 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्तानं पाहूया डॅनी आणि तिची अर्धवट राहिलेली लव्हस्टोरी...

काही वर्षांपूर्वी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य करताना डॅनी डॅन्झोपा यांनी परवीनसोबतच्या नात्यावर खुलासा केला होता. परवीन आणि ते जवळपास चार वर्ष एकत्र राहिले होते. परंतु तरी देखील तिची विचार करण्याची पद्धत त्यांना कळली नाही. त्यांचं परवीनवर प्रेम होतं पण तिची जीवनशैली पसंत नसल्यामुळं त्यांनी ब्रेकअप केला. त्यानंतर डॅनी अभिनेत्री किमसोबत रिलेशनशिपमध्ये होते. पण परवीनसोबतची त्यांची मैत्री संपलेली नव्हती. ती कधीही त्यांच्या घरी यायची अन् तिचं हे वागणं किमला आवडत नव्हतं. त्यामुळं डॅनीसोबत तिचे खटके उडू लागले. याचदरम्यान ती कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये देखील राहिली होती. पण तिचं लक्ष डॅनींकडेच होतं.

अवश्य पाहा - पाहा 50 वर्षीय कश्मिराचा बोल्ड अंदाज; Bikini Walk पाहून व्हाल थक्क

डॅनी आणि परवीन यांचं नातं संपून बरीच वर्षे उलटली होती. त्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या होत्या. पण, नात्यातील बंध अद्यापही कायम होता. परवीन यांच्या अंत्ययात्रेच्या वेळीसुद्धा डॅनी यांची उपस्थिती होती. एकेकाळी ज्या अभिनेत्रीला आपल्या चित्रपटासाठी साईन करण्याकरिता निर्माते, दिग्दर्शकांची रांग लागायची, तिच्या शेवटच्या क्षणांमध्ये मात्र कबीर बेदी, महेश भट्ट, जॉनी बक्शी, रंजीत आणि ‘काला सोना’चे निर्माते हरिश शाह अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच मंडळींची उपस्थिती होती.

First published:

Tags: Bollywood actress