मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अभिनेता कार्तिक आर्यनवर भडकली 'दंगल गर्ल'; फातिमा सना शेखने केला गंभीर आरोप

अभिनेता कार्तिक आर्यनवर भडकली 'दंगल गर्ल'; फातिमा सना शेखने केला गंभीर आरोप

अभिनेता कार्तिक आर्यनच्या (karthik aryan) एका चुकीमुळे अभिनेत्री फातिमा सना शेख (fatima sana sheikh) संतप्त झाली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनच्या (karthik aryan) एका चुकीमुळे अभिनेत्री फातिमा सना शेख (fatima sana sheikh) संतप्त झाली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनच्या (karthik aryan) एका चुकीमुळे अभिनेत्री फातिमा सना शेख (fatima sana sheikh) संतप्त झाली आहे.

    मुंबई, 28 एप्रिल : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik aaryan) हा आपल्या अभिनयाने प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. त्याला मोठमोठ्या बॅनरचे चित्रपटही करायला मिळाले आहेत. पण सध्या तो वेगळ्या कारणांसाठीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक करण जोहरने दोस्ताना 2 चित्रपटातून कार्तिकची हकालपट्टी केली होती. त्यामुळे तो चर्चेत होता आता तो चर्चेत आहे त्याला कारण आहे दंगल गर्ल (Dangal) अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh).

    बॉलिवूडलाईफशी बोलताना फातिमाने आपण कार्तिक आर्यनवर रागावलो असल्याचं सांगितलं आहे. फातिमाने कार्तिकवर आरोपही केले आहेत. फातिमा म्हणाली, ‘कार्तिक नेहमी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले बालपणीचे फोटो शेअर करत असतो. पण त्या फोटोंचं क्रेडिट मात्र देत नाही. ते सगळे फोटो मी लहानपणी क्लिक केले आहेत. तो क्रेडिट देत नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटतं. मला माझं क्रेडिट मिळायलाच हवं.’

    हे वाचा - माझ्या मित्राचा श्वास गुदमरतोय...; अभिनेत्रीने सोशल मीडियावर मदतीसाठी पसरले हात

    दुसरीकडे फातिमाने आपण सोशल मीडियावर ब्रेक घेत असल्याचंही जाहीर केलं. ‘सोशल मीडियातून ब्रेक घेत आहे. मित्रांनो, सुरक्षित रहा.’, असं तिनं इन्स्टाग्राम स्टोरीत म्हटलं होतं. फातिमाने सोशल मीडियावरून ब्रेक (Social Media Break) घेतल्यामुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी प्रतिक्रिया करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तिला ब्रेक न घेण्याची विनंती केली आहे. फातिमा आता काय करते ते बघावं लागेल. तिनीे कार्तिकबद्दल केलेलं विधान आणि तिचा हा सोशल मीडिया ब्रेक यामागेही काही विशेष कारण आहे का अशीही चर्चा फॅन्समध्ये सुरू आहे.

    फातिमाने दंगल या चित्रपटात अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सोबत काम केलं आहे. तिने चाची-420 या हिंदी चित्रपटात कमल हसन आणि तब्बू यांच्या मुलीचा रोल केला होता. हाच तिचा पहिला चित्रपट होता. नंतरही तिने अनेक चित्रपटांत कामं केली. पण दंगलमधील तिच्या कामामुळे तिला बॉलिवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण करता आलं. दंगल चित्रपटातल्या तिने साकारलेल्या महिला पैलवान मुलीच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.

    हे वाचा - 'यात माझी काय चूक'; संतापलेल्या डॉक्टरनं अभिनेत्रीवर ठोकला मानहानीचा दावा....

    फातिमाकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. नवनवीन चित्रपटांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. पण सध्या तिने सोशल मीडिया ब्रेक घेतला आहे. त्यामुळे आता ती सोशल मीडियावर कधी परतणार याचीच प्रतीक्षा तिचे चाहते करत आहेत.

    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actress, Kartik aryan