S M L

चीनमध्येही आमिरच्या 'दंगल'ची धाकड कमाई

या सिनेमाने चीनमध्ये रिलीजनंतर अवघ्या दोन दिवसांतच ४० कोटींचा टप्पा पार करत नवा रेकॉर्ड तयार केलाय. तिथे हा सिनेमा ९००० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आलाय.

Sonali Deshpande | Updated On: May 7, 2017 09:49 PM IST

चीनमध्येही आमिरच्या 'दंगल'ची धाकड कमाई

07 मे : भारतामध्ये सुपरहिट ठरलेल्या आमिरच्या दंगल या सिनेमाची जादू चीनमध्येही चालताना दिसत आहे. या सिनेमाने चीनमध्ये रिलीजनंतर अवघ्या दोन दिवसांतच ४० कोटींचा टप्पा पार करत नवा रेकॉर्ड तयार केलाय. तिथे हा सिनेमा ९००० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आलाय.

तरण आदर्श यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिलीय. ही कमाई शुक्रवार आणि शनिवारची असून ही तर केवळ सुरुवात आहे असंही तरण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

चीनमध्ये हा सिनेमा डब करून ' शुआई जियाओ बाबा ' या नावानं रिलीज करण्यात आलाय. ज्याचा अर्थ आहे, ' चला पिताजी कुस्ती खेळू '.आमिरचा 'पीके' हा सिनेमादेखील चीनमध्ये रिलीज झाला होता,ज्याने तिथे १०० कोटींची कमाई केली होती.

आतापर्यंत 'दंगल' ने एकूण ७१८ कोटींची कमाई केली असली तरीही ७९२ कोटींची कमाई केलेल्या 'पीके'चा रेकॉर्ड कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2017 09:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close