आॅस्ट्रेलियात 'दंगल'ला सर्वोत्कृष्ट आशियाई सिनेमाचा पुरस्कार

आॅस्ट्रेलियात 'दंगल'ला सर्वोत्कृष्ट आशियाई सिनेमाचा पुरस्कार

परफेक्शनिस्ट आमिर खानची मुख्य भूमिका असणाऱ्या 'दंगल' सिनेमाची वर्षभरानंतरही घोडदौड सुरूच आहे. सातव्या 'ऑस्ट्रेलियन अकॅडमी ऑफ सिनेमा अॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स अवॉडर्स'मध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई सिनेमाचा पुरस्कार दंगलला मिळालाय.

  • Share this:

08 डिसेंबर : परफेक्शनिस्ट आमिर खानची मुख्य भूमिका असणाऱ्या 'दंगल' सिनेमाची वर्षभरानंतरही घोडदौड सुरूच आहे. सातव्या 'ऑस्ट्रेलियन अकॅडमी ऑफ सिनेमा अॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स अवॉडर्स'मध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई सिनेमाचा पुरस्कार दंगलला मिळालाय.

अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यंदा हा पुरस्कार 'दंगल'ला दिला जाणार असल्याची घोषणा केलीय. 'दंगल'ला मिळालेल्या या बहुमानामुळे सिनेमाची टीम पुरती भारावून गेलीये.

सिनेमा निवड समितीचा अध्यक्ष होता हाॅलिवूड अभिनेता रसेल क्रो. त्यानं म्हटलंय की सर्वानुमते दंगलला हा पुरस्कार देण्यात आला. भारताप्रमाणे परदेशातही या सिनेमाचा गौरव झालाय. चीनमध्ये या सिनेमानं 'बाहुबली2'पेक्षाही जास्त कमाई केली.

First published: December 8, 2017, 2:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading