दंगलने पार केला 2 हजार कोटींचा टप्पा

दंगलने 2 हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. भारतासह जगभरात एवढा गल्ला जमवणारा दंगल पहिलाच भारतीय सिनेमा ठरलाय

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2017 01:42 PM IST

दंगलने पार केला 2 हजार कोटींचा टप्पा

27 जून :  चीनमध्ये अडीच कोटींचा गल्ला जमवत दंगलने 2 हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. भारतासह जगभरात एवढा गल्ला जमवणारा दंगल पहिलाच भारतीय सिनेमा ठरलाय.

दंगल इंग्लिश व्यतिरिक्त इतर भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट इतिहासातील पाचवा सिनेमा ठरलाय. दंगल हा 2017 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा खेळावर आधारित असा पहिला सिनेमा आहे. तर चीनमध्ये सर्वाधिक गल्ला जमवणारा पहिलाच नॉन-हॉलिवूड सिनेमा ठरलाय.

दंगलच्या या यशामुळे आमिर चीनमध्ये  नरेंद्र मोदींहून अधिक प्रसिद्ध झालाय.  दंगलने चिनी बॉक्स आॅफीसवर कॅप्टन अमेरिका , ट्रान्सफॉर्मर्स ,कुंगफू पांडा 3 सारख्या दिग्गज  सिनेमांना मागे  टाकलयं.आपल्या मुलींना पुढे  नेण्यासाठी बापाने केलेली धडपड चिनी माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरतो आणि हेच दंगलच्या चीनमधल्या यशाचं रहस्य आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 01:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...