• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ...आणि प्रिया बापटने नवऱ्यालाही नाचवलं; जोडप्याच्या Videoला तुफान पसंती

...आणि प्रिया बापटने नवऱ्यालाही नाचवलं; जोडप्याच्या Videoला तुफान पसंती

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर : मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya bapat) सोशल मीडियावर (Social Media) नेहमी सक्रिय असते. ती तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर (Video Viral On Social Media) करत असते. प्रिया अलीकडे तिचे काही फिटनेसचे देखील व्हिडिओ शेअर करत आहे. आता प्रियाने नवरा उमेश कामतसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Dance video of Priya Bapat and Umesh Kamat goes viral on social media) या व्हिडीओमध्ये प्रिया बापट नवरा उमेशसोबत डान्स करताना दिसत आहे. हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. प्रिया बापटने शेअर केलेला हा व्हिडिओ इन्स्टा रील आहे. यामध्ये प्रिया उमेशसोबत एका म्युझिकवर डान्स करीत आहे. इमारतीच्या टेरेसवर हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओवर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे ही वाचा-'वाईट गोष्टी संपून आयुष्यात पुन्हा आनंदाचे..' ; सोनली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत सध्या इन्स्टा रील वार जोरात आहे. आणि रोज अशी अनेक रील सोशल मीडियावर सेलेब्स बनवताना दिसतात. या रीलच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होते. प्रिया पती उमेश कामतसोबत देखील अशाप्रकरची काही भन्नाट रील शेअर करत असते. उमेश कामत सध्या अजूनही बरसात आहे या मालिकेत दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)

  या जोडप्याने 2011 मध्ये लग्न गाठ बांधली होती आणि त्यांनी ‘टाईम प्लीज’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘आणि काय हवं?…’ या वेब सीरीजच्या माध्यमातून उमेशने पहिल्यांदाच वेब विश्वात पदार्पण केले होते. तर, प्रिया बापटची ही दुसरी सीरीज होती. ‘आणि काय हवं?…’चे तिसरे पर्व काहीच दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीस आले आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: