मुंबई, 2 जानेवारी : छोट्या पडद्यावरच्या मालिकांचं (Daily soaps) एक वेगळंच जग आहे. या मालिका अक्षरश: भक्तिभावानं पाहत त्यातील कलाकारांना मनापासून फॉलो करणारे लोक कमी नाहीत. आपल्या आवडत्या कलाकाराची कुठलीही अदा ते डोक्यावर घेतात.
मराठी मालिकाही (Marathi Daliy Soaps) याला अपवाद नाहीत. मराठी मालिकेतील एका मराठमोळ्या अभिनेत्रीची (Marathi actress) अशीच एक अदा सध्या तुफान लोकप्रिय होते आहे. ती आहे 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतल्या एका व्यक्तिरेखेची. या व्यक्तिरेखेचं नाव आहे कीर्ती. ही कीर्ती कमी काळातच अनेकांची लाडकी बनलीय. सध्या तिनं केलेला एक डान्स (dance) खूप गाजतो आहे. या अभिनेत्रीचं खरं नाव आहे समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar).
केवळ 13 सेकंदाच्या या व्हीडिओत (video) कीर्तीनं 'हमको आजकल है इंतजार...' या मूळ माधुरी दीक्षितवर (Madhuri Dixit) चित्रित झालेल्या गाण्यावर तुफान डान्स केला आहे. मोरपिशी रंगाच्या साडीत मोजक्याच मेकपसह ती अतिशय आत्मविश्वासानं नृत्य सादर करते आहे. तिच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा अतिशय जिवंत आहेत.
मालिकेत एका भाबड्या मुलीची भूमिका करणारी कीर्ती उर्फ समृद्धी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अतिशय मनमोकळी आणि कॉन्फिडंट तरुणी आहे. या व्हीडिओनंतर मालिका न पाहणाऱ्या लोकांचंही लक्ष समृद्धीनं वेधून घेतलं आहे. त्यातून तिच्या लोकप्रियतेमध्ये अजूनच वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tv actress, Viral video.