डान्स प्लसच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘ब्लाइन्ड डान्स’, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

डान्स प्लसच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘ब्लाइन्ड डान्स’, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

या शोच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडणार आहे. हा परफॉर्मन्स पाहून जज सुद्धा हैराण झाले...

  • Share this:

मुंबई, 01 फेब्रुवारी : स्टार प्लसवरील डान्स रिअलिटी शो डान्स प्लस यंदा खूप चर्चेत आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळत आहेत. पण या शोच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडणार आहे. जे या आधी कधीच घडलं नव्हतं. या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे जो पाहिल्यावर सर्वजण थक्क झाले आहेत.

डान्स प्लसच्या मंचावर पहिल्यांदाच ब्लाइन्ड डान्स

स्टार प्लसच्या ऑफिशिअल पेजवर नुकताच नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यात या शोमधील स्पर्धक रुपेश ब्लाइन्ड डान्स करताना दिसत आहे. रुपेशनं हा संपूर्ण परफॉर्मन्स डोळे बंद करुन सादर केला. त्याचा हा डान्स पाहिल्यावर इतर स्पर्धक आणि प्रेक्षकांसोबत जज सुद्धा हैराण झाले.

VIDEO : मुंबईच्या ट्राफिकमध्ये सोनाक्षीची बुलेट राइड, युजर्स म्हणाले...

रुपेशचा हा डान्स पाहिल्यावर जज रेमो डिसुझा म्हणाला, मी दाव्यानिशी सांगतो, डोळे बंद करुन कोणी दहा पावलं कोणी सरळ चालून दाखवावं तर मी मानतो हा या संपूर्ण सीझनमधील सर्वात दमदार परफॉर्मन्स आहे. स्टार प्लसनं हा व्हिडीओ शेअर करतानाच्या त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, क्रेझी... आपण आता काय पाहिलं. रुपेशच्या या ब्लाइन्ड डान्सनं अंगावर शहारे आणतो.

कॅलेंडवर चालतं 'या' अभिनेत्रीचं आयुष्य, वर्षातून फक्त 12 वेळाच होते पतीची भेट

प्रजासत्ताक दिनाला या शोमध्ये शाहरुख खाननं हजेरी लावली होती आणि तो या स्पर्धकांच्या परफॉर्मन्सवर खूपच खूश झालेला पहायला मिळाला होता. यामधील एक परफॉर्मन्स त्याला एवढा आवडला की त्यानं पुन्हा एकदा ऑनस्क्रिन सैनिकाची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली. त्या स्पर्धकाचं कौतुक करताना शाहरुख म्हणाला, भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच वाघ, चित्ता, हत्ती घोडा सर्व मागे पडलेत फक्त सगळ्यात तू पुढे गेलास. हा परफॉर्मन्स अबरामला सुद्धा आवडल्याचं शाहरुखनं यावेळी सांगितलं.

रिव्हिलिंग ड्रेसमुळे प्रियांका झाली ट्रोल, आई मधू चोप्रां टीकाकारांना म्हटलं...

First published: February 1, 2020, 1:50 PM IST

ताज्या बातम्या