Home /News /entertainment /

‘Dance India Dance’ फेम कलाकाराचा भीषण अपघात; मृत्यूशी देतोय झुंज

‘Dance India Dance’ फेम कलाकाराचा भीषण अपघात; मृत्यूशी देतोय झुंज

बाईकला एका कारनं धडक दिली. परिणामी त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

  मुंबई 6 जून: डान्स इंडिया डान्स (Dance India Dance) या शोमुळं नावारुपास आलेला प्रसिद्ध डान्सर बिकी दास (Biki Das) याचा अपघात झाला आहे. लॉकडाउनच्या काळात बेरोजगार झालेला बिकी कोलकातामध्ये फूड डिलिव्हरीचं काम करत होता. हे काम करत असतनाच त्याचा अपघात झाला. (Biki Das injured in road accident) त्याच्या बाईकला एका कारनं धडक दिली. परिणामी त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. बिकी दास हा डान्स इंडिया डान्सच्या चौथ्या पर्वामध्ये झळकला होता. त्यानं आपल्या ब्रेक डान्स शैलीनं स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली होती. त्यावेळी त्याला DIDचा ब्रेक डान्सर म्हणून ओळखलं जायचं. परंतु DID नंतर डान्सर म्हणून त्याला फारसं काम मिळालं नाही. परिणामी तो इतरत्र नोकरी करुन आपला उदरनिर्वाह करत आहे. अशोक सराफ यांनी का नाकारले गेस्ट रोल? सांगितलं चकित करणारं कारण
  हिरव्या पैठणीत दिसली यामी; पाहा अभिनेत्रीच्या संपूर्ण विवाह सोहळ्याचे Photo लॉकडाउनमध्ये त्याची नोकरी गेली त्यामुळं फुड डिलिव्हरीचं काम तो करत होता. मात्र हे काम करत असताना त्याचा अपघात झाला. हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळं त्याला उभं राहता येत नाहिये. बिकी यापुढे त्याला डान्स करता येईल की नाही? या विचारानं सध्या त्रस्त आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Road accident

  पुढील बातम्या