VIDEO : ही पहा दहिहंडीची सुपर हिट गाणी

VIDEO : ही पहा दहिहंडीची सुपर हिट गाणी

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेंबर : सगळीकडे कृष्णाष्टमीची धामधूम सुरू झालीय. दहिहंडी फोडायचा उत्साहही सगळीकडे दिसतोय. बाॅलिवूडच्या गाण्यांशिवाय दहिहंडीचा उत्सव पूर्ण होऊ शकत नाही. अगदी जुनी गाणी आजही सुपरहिट आहेत. अशाच काही गाण्यांवर एक नजर.

दहिहंडीचं ब्लफ मास्टरमधलं शम्मी कपूरचं गोविंदा आला रे आला गाणं एव्हरग्रीन. त्यातली शम्मी कपूर यांची एनर्जी पाहूनच उत्साह येतो.

शत्रुघ्न सिन्हा, भगवान दादा आणि किशोर कुमार यांनी बदला या सिनेमातलं दहिहंडीचं हे गाणं खूपच मजा आणतं.

'खुद्दार' सिनेमातलं मच गया शोर सारी नगरी रे हे अमिताभ आणि परवीन बाबीवरचं गाणं आजही प्रत्येक दहिहंडीत वाजवलं जातं.

राणी मुखर्जी आणि सलमान खान यांचं हॅलो ब्रदर सिनेमातलं गाणंही खूप गाजलं. तरुणांमध्ये ते जास्त प्रिय आहे.

'ओ माय गाॅड' सिनेमात गोविंदाचं गाणं खास वेगळं अॅड केलं होतं. गो गो गोविंदा म्हणत सोनाक्षी सिन्हा आणि प्रभू देवा थिरकले होते.

आला रे आला गोविंदा आला म्हणत 'काला बाजार'मध्ये अनिल कपूर आणि जॅकी श्राॅफ यांनी हे गाणं हिट केलं होतं.

'अग्निपथ 2'मध्ये हृतिक रोशनचा दहिहंडी फोडण्याचा शाॅट खूपच गाजला होता. सोबत होती प्रियांका चोप्रा.

PHOTOS : 'सविता दामोदर परांजपे'च्या प्रीमियरला कलाकारांचा जलवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2018 02:58 PM IST

ताज्या बातम्या