अभिनेता संतोष जुवेकरवर पुण्यात गुन्हा दाखल

अभिनेता संतोष जुवेकरवर पुण्यात गुन्हा दाखल

दहीहंडी हा आता एक खेळ राहिला नसून त्याला व्यावसायिक स्वरुप आलं आहे

  • Share this:

पुणे, ०५ सप्टेंबर- दहीहंडी हा आता एक खेळ राहिला नसून त्याला व्यावसायिक स्वरुप आलं आहे. या उत्सवातून कोट्यवधींची उलाढाल केली जाते. अनेक कलाकारांना वेगवेगळ्या ठिकाणी आमंत्रण दिली जातात. यात मराठी कलाकारही काही मागे नाहीत.

पुण्यातील सहकार नगर परिसरात अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळातर्फे दहीहंडी उभारण्यात आली होती. अरण्येश्वर चौकात अर्थात सार्वजनिक ठिकाणी २५ बाय २० लांब रस्त्याच्या मधोमध ही हंडी उभारली होती. रस्त्याच्या मधोमध हंडी बांधल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. हे कमी की काय मोठ्या आवाजात डॉल्बी लावल्याने प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात ध्वनीप्रदूषण झालं. याचा तिथल्या स्थानिक लोकांना प्रचंड त्रास झाला.

आदेशाचा भंग केल्याने पोलिसांनी हा कार्यक्रम बंद करण्यास सांगितले होते. मात्र आयोजकांनी कार्यक्रम तर बंद केलाच नाही शिवाय उलट शासकीय कार्यात अडथळा निर्माण केल्याचा उलटा आरोप केला. त्यामुळे सर्वांविरोधात सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

VIDEO : याला कुणी आवरा रे...

First published: September 5, 2018, 1:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading