मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Pooja Sawant: 'ज्या कलरफुलवर तुम्ही प्रेम केलं...', नेमकं कशाबाबत बोलतेय पूजा सावंत?

Pooja Sawant: 'ज्या कलरफुलवर तुम्ही प्रेम केलं...', नेमकं कशाबाबत बोलतेय पूजा सावंत?

Pooja Sawant

Pooja Sawant

पूजा सावंतनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये पूजाचा मनोहक अंदाज पहायला मिळतोय.

मुंबई, 11 ऑगस्ट : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतनं  (Pooja Sawant) अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत तिनं प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं आहे. मराठी सिनेसृष्टीत तिला 'कलरफुल' गर्ल म्हणून एक नवी ओळख मिळाली आहे. पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. निरनिराळे फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. अशातच पूजानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे ती आणखीनच चर्चेत आली आहे. पूजा सावंतनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये पूजाचा मनोहक अंदाज पहायला मिळतोय. पूजानं साडी घालून, शृंगार करुन व्हिडीओ बनवला आहे. तिचा हा साडीमधला व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पूजाचा सोज्वळ लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडाताना दिसतोय. हेही वाचा -  Vidya Balan: बॉलिवूडवर नाराज विद्या बालन; काय आहे नेमकं प्रकरण? पूजानं व्हिडीओ शेअर करत कॅप्शनही खूप छान दिलंय. 'ज्या कलरफुल वर तुम्ही मनापासून प्रेम केलंत, ती पुन्हा येतेय तुम्हा सगळ्यांना भेटायला', असं म्हणत पूजानं व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केलाय. पूजाचा हा लुक तिचा आगामी चित्रपट 'दगडी चाळ 2' मधला असून चित्रपटाच्या प्रमोशची सुरुवात झाली असल्याचं तिनं म्हटलं आहे. या चित्रपटातील पहिल्या भागात पूजानं सोनलची भूमिका साकरली होती. आता दुसऱ्या भागात तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची किती पसंती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'दगडी चाळ' चित्रपट चांगलाच गाजला. त्यानंतर चाहत्यांकडून दगडी चाळच्या दुसऱ्या भागाची मागणी केली जात होती. त्यानंतर निर्मात्यांनी 'दगडी चाळ 2' ची घोषणा केली. आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला असून चित्रपटातील कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त झाल्याचं दिसतंय. येत्या 18 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Upcoming movie

पुढील बातम्या