'बाबा मला जीवे मारतील'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या व्हायरल Video मुळे मालिका क्षेत्रात खळबळ

'बाबा मला जीवे मारतील'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या व्हायरल Video मुळे मालिका क्षेत्रात खळबळ

अभिनेत्रीने बालाजी प्रॉडक्शन हाऊसची मालिका 'कुमकुम भाग्य'पासून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली.

  • Share this:

बरेली, 26 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील बरेली येथे राहणारी टिव्ही अभिनेत्री तृप्ती शंखधर हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तृप्ती आपल्या वडिलांवर अनेक आरोप लावत आहे. तिचे वडील तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तृप्तीने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

अभिनेत्रीने व्हिडीओच्या माध्यमातून बरेलीच्या पोलिसांना सुरक्षा मिळवून देण्याचं आवाहन केलं आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तृप्तीने मुख्यमंत्री योगी आणि बरेलीच्या पोलिसांना टॅग केलं आहे.

वडिलांनी केस पकडून मारलं

व्हायरल व्हिडीओमध्ये तृप्ती शंखधर म्हणतेय की, तिचे वडील राम रतन शंखधर यांनी तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितले की वडिलांनी केस पकडून तिला मारहाण केली आणि हात कापण्याचा प्रयत्न केला. तृप्तीने व्हिडीओमध्ये सांगितले की तिचे वडिल तिला आणि आईला सातत्याने मारहाण करीत आहेत.

आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न लावून देण्यासाठी केलं टॉर्चर

तृप्ती शंखधर व्हिडीओमध्ये सांगत आहे की ती आपल्या मर्जीने काहीच करू शकत नाही. तिने सांगितले की वडील मुंबईला जाण्यासाठी लागलेला खर्च मागत आहेत, अन्यथा माझ्या मनाप्रमाणे लग्न करं, अशी जबरदस्तीही करीत आहेत. तृप्ती 19 वर्षांची असून तिचे वडील 28 वर्षांच्या मुलासोबत तिचं लग्न लावून देत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतप तृप्ती सुखरुप असल्याची माहिती आहे. तृप्तीच्या आईनेही वडिलांवर मारहाणीचा आरोप केला आहे.

तृप्तीने बालाजी प्रॉडक्शन हाऊसची मालिका कुमकुम भाग्यपासून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली. सीरियलमध्ये मुख्य भूमिका मिळाल्यानंतर तिने देव-2, परमावतार श्री कृष्ण, जिंदगी यू टर्न, कसौटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं. सध्या ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करीत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 26, 2020, 3:55 PM IST
Tags: TV serials

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading