Daddy झाले Grandpa; अरुण गवळींच्या घरातून आली GOOD NEWS!

Daddy झाले Grandpa; अरुण गवळींच्या घरातून आली GOOD NEWS!

अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी मागील वर्षी मे महिन्यात लग्नगाठ बांधली होती. 8 मे रोजी त्यांच लग्न झालं होतं. लग्नाच्या या वर्षपूर्तीला त्यांनी ही गोड बातमी दिली आहे.

  • Share this:

मुंबई 7 मे : अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’ अशा चित्रपटातूंन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर आता तो बाबा झाला असल्याने सोशल मीडियावर त्याने ही गोड बातमी दिली आहे. अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी मागील वर्षी  मे महिन्यात लग्नगाठ बांधली होती. 8 मे रोजी त्यांच लग्न झालं होतं. लग्नाच्या या वर्षपूर्तीला त्यांनी ही गोड बातमी दिली आहे.

योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी (Arun Gawali) यांची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी हे आजोबा झाले आहेत. अक्षय आणि योगिताला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. आज दुपारी त्यांनी ही गोड बातमी दिली. बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील नर्सिंगहोम मध्ये झाला आहे. अक्षयने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली होती.

अक्षयने बाबा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकत नाही. एक बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघेही सुखरूप आहेत'.

‘आता त्याला कसं वाटत असेल?’; छोटा राजनच्या मृत्यूनंतर राम गोपाल वर्मांना दाऊदची चिंता

पुढे बोलताना तो म्हणाला, 'आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच या गोड बातमीने हा आनंद द्विगुणित झाला आहे. कुटुंबात नवीन सदस्य येणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. इतकेच नव्हे तर बाळाचे नाव काय ठेवणार अशा प्रश्नांनी भंडावून सोडले आहे'.

अक्षय आणि योगिताच्या चाहत्यांनी ही त्यांना अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगीरी, बस स्टॉप या चित्रपटांमध्ये तो झळकला होता.

Published by: News Digital
First published: May 7, 2021, 9:07 PM IST

ताज्या बातम्या