ज्येष्ठ दिग्दर्शक के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

साऊण्ड डिझायनर ते दिग्दर्शक असा त्यांचा प्रवास आहे. तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2017 06:27 PM IST

ज्येष्ठ दिग्दर्शक के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

24 एप्रिल : भारतात सिनेविश्वात अग्रगणी समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक के.विश्वनाथ यांना घोषित झालाय. साऊण्ड डिझायनर ते दिग्दर्शक असा त्यांचा प्रवास आहे. तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. यापूर्वी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.

काही राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक फिल्मफेअर पुरस्कार, नांदी पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झालाय. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, साऊण्ड डिझायनर अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी सिनेसृष्टीसाठी सातहून अधिक दशकं त्यांनी काम केलंय.

के. विश्वनाथ यांनी दिग्दर्शित केलेला 'स्वाती मुथ्यम' या सिनेमाला 59व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून ऑफिशियल एण्ट्री म्हणून पाठवण्यात आलं होतं. जाग उठा इंसान, संजोग, ईश्वर, संगीत, धनवान, हे त्यांचे गाजलेले काही हिंदी सिनेमे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 06:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...