• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘आई कुठे काय करते’ मधील संजनाने रूपाली भोसलेला मिळवून दिला मोठ्या नावाचा पुरस्कार; स्वतः शेअर केली बातमी

‘आई कुठे काय करते’ मधील संजनाने रूपाली भोसलेला मिळवून दिला मोठ्या नावाचा पुरस्कार; स्वतः शेअर केली बातमी

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मधील संजना फेम रूपाली भोसलेला नकारात्मक भूमिकेसाठी मोठ्या नावाचा पुरस्कार मिळाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर- छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करते आहे. मालिकेत सध्या अनेक घटना घडत आहेत. या मालिकेत नकारत्मक भूमिका साकारणारी संजना म्हणजे अभिनेत्री रूपाली भोसले (Actress Rupali Bhosale) या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघऱात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियात दिली. भूमिका जरी नकारात्मक असली तरी तिनं अभिनयाच्या जीवावर यामध्ये जीव ओतला आहे. आता तिला याच भूमिकेसाठी 2021 चा दादासाहेब फाळके आयकॉन फिल्म पुरस्कार  जाहीर झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं याबद्दल माहिती दिली आहे. रूपाली भोसलेने इन्स्टा पोस्ट करत तिला ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील नकारात्मक भूमिकेसाठी दादासाहेब फाळके आयकॉन फिल्म पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती दिली आहे. तिनं यासोबत एक पोस्टर देखील शेअर केले आहे ज्यामध्ये या पुरस्काराबद्दल माहिती दिली आहे. Dadasaheb Phalk Icon Award Films Organisation And Dpiaf -Roti And Kapda Bank यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे. रुपालीने ही गोष्ट जाहीर करताच चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा : अमृता खानविलकरच्या घरी बर्थडे पार्टीची धम्माल; अभिनेत्रीने पतीसोबत दिली रोमँटिक पोज अभिनेत्री रूपाली भोसलेने आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांच्या मानत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच या मालिकेतील संजना दीक्षित म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसले सध्या सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव असते. तिच्या फॅशन सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असते.
  रुपाली भोसले हिने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये आपली भूमिका गाजविली आहे. ‘कसमे वादे, बडी दूर से आये हैं, आयुषमान भव , तेनाली रामा’ या हिंदी मालिकांमध्ये रुपालीने काम केले आहे.रूपाली भोसलेने तीच्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये छोटे-मोठे पात्र साकारले आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published: