Home /News /entertainment /

कियारा अडवाणीचं TOPLESS फोटोशूट आहे चोरीचं? वाचा काय आहे नवा वाद

कियारा अडवाणीचं TOPLESS फोटोशूट आहे चोरीचं? वाचा काय आहे नवा वाद

डब्बू रत्नानी कॅलेंडरसाठी कियारानं केलेल्या टॉपलेस फोटोशूटवरुन डब्बू रत्नानीला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता नवा वाद सुरू झाला आहे.

  मुंबई, 21 फेब्रुवारी : बॉलिवूड सेलिब्रेटी फोटोग्राफर डब्बू रत्नीनीनं नुकतंच त्याचं कॅलेंडर लॉन्च केलं. ज्यावर बॉलिवूडचे टॉप सेलिब्रेट झळकले. पण यात सर्वाधिक चर्चेत राहिली ती अभिनेत्री कियारा अडवाणी. डब्बू रत्नानी कॅलेंडरसाठी कियारानं टॉपलेस फोटोशूट केलं होतं. ज्यात तिनं एका पानानं आपलं शरीर झाकलं होतं. हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यावर अनेक मीम्स व्हायरल झाले ज्यात युजर्सनी कियाराला कपडे घातलेले दिसले. पण आता याच फोटोवरून सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. कियाराच्या या फोटोशूटची संकल्पना चोरीची असल्याचा आरोप डब्बू रत्नानीवर केला जात आहे. इंटरनॅशनल फोटोग्राफर मॅरी बार्शनं डब्बू रत्नानीवर त्याची संकल्पना चोरल्याचा आरोप केला आहे. कियाराच्या फोटोशूटसाठी वापरलेली ही मूळ संकल्पना मॅरी बार्शची आहे. त्यानं नोव्हेंबर 2019मध्ये असं एक फोटोशूट केलं होतं. त्यामुळे आता सोशल मीडियावर आता या दोन्ही फोटोंचं कोलाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आधीच कियाराच्या टॉपलेस फोटोमुळे डब्बू रत्नानीला ट्रोल व्हावं लागलं होतं त्यानंतर आता या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सार्वजनिक ठिकाणी पतीसोबत इंटिमेट झाली अभिनेत्री, व्हायरल होतोय असा VIDEO
  प्रोफेशनल लाइफमध्ये बीझी आहे कियारा कियारा अडवाणीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर 2019 वर्ष तिच्यासाठी खूपच लकी ठरलं. मागच्या वर्षी तिचे कबीर सिंह आणि गुड न्यूज हे दोन सिनेमा रिलीज झाले होते आणि हे दोन्ही सिनेमा सुपरहीट ठरले. यातील कबीर सिंहमध्ये तिनं शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. तर गुड न्यूजमध्ये ती दिलजीत दोसांझसोबत दिसली होती. शाहिद कपूरशी ब्रेकअप, 13 वर्षांनंतर करिनानं केला धक्कादायक खुलासा याशिवाय 2020 मध्ये कियाराकडे अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब, इंदू की जवानी, कार्तिक आर्यनचा भूलभूलैय्या आणि सिद्धार्थ मल्होत्राचा शेरशाह हे सिनेमा आहेत. त्यामुळे एकूणचं यंदाचं तिचे शेड्युल खूप बीझी आहे. या वर्षी तिचे 4 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सलमान नेहमीच काळे कपडे का घालतो? डिझायनरनं सांगितलं सिक्रेट
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Dabboo ratnani

  पुढील बातम्या