सलमान खानने सांगितलं कोण आहे खेळाच्या मैदानातील खरा 'दबंग'?

सलमान खानने सांगितलं कोण आहे खेळाच्या मैदानातील खरा 'दबंग'?

सलमान खानचा दबंग हा पहिला चित्रपट 2010 तर दबंग-2 हा 2012 रोजी प्रदर्शित करण्यात आला होता.

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर: बॉलिवू़डचा प्रसिद्ध सुपरस्टार सलमान खानचा दबंग-3 सिनेमा लवकरच बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या चित्रपटातील दबंग चुलबुल पांडे असला तरी त्याच्या दृष्टीनं खेळाच्या मैदानातील खरा दबंग कोण आहे? असा प्रश्न सलमान खानला क्रिकेट प्रेमींनी विचार आला. दबंग चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधी सलमाननं द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर तो स्टार स्पोर्ट्सवरील नेरोलॅक क्रिकेट लाइव कार्यक्रमात सहभागी झाला होता. रविवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे सामना झाला. त्या पार्श्वभूमीवर सलमान खानला हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी सलमान खानने त्याचा आवडता क्रिकेटर कोण आहे याबाबतही सांगितलं.

वाचा-लावणीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड', 5 हजार नृत्यांगणा थिरकल्या ढोलकीच्या तालावर PHOTOS

चेन्नईतील चेपक स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्टइंडिज वन डे सामना रंगला होता. स्टार स्पोर्टसवरील शो दरम्या चुलबुल पांडेला विचारण्यात आलेला प्रश्न असा होता खेळाच्या मैदानातील खरा दबंग कोण आहे? या वन डे सामन्या जरी भारत हरला असला तरीही चुलबुल पांडेनं दिलेल्या उत्तरामुळे क्रिकेटप्रेमींची मन मात्र जिंकली आहेत. स्टार स्पोर्टसवरील प्री-शो नेरोलॅक क्रिकेट लाइव्हमध्ये रविवारी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान सहभागी झाला होता. यावेळी गोलंदाज केदार जाधवसोबत असणारी खास दोस्ती आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. भारतीय क्रिकेट संघातील माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा खेळाच्या मैदानातील खरा दबंग असल्याचं त्याने सांगितलं. यासोबतच महेंद्र सिंग धोनीचं तोंडभरून कौतुकही केलं आहे. धोनी आपल्या आवडता क्रिकेटपटू असल्याचंही त्याने सांगितलं. सलमान खानसोबत दबंग-3 चित्रटाचे अभिनेता सुदीपही सहभागी झाले होते.

वाचा-वयच्या 52 व्या वर्षीही या करणांमुळे माधुरी दीक्षित दिसते तरुण!

हाच प्रश्न सुदीप यांना विचारण्यात आला होता. जो क्रिकेटच्या पीचवर त्या दिवशी छान खेळतो तो माझा आवडता क्रिकेटपटू असं त्यांनी सांगितलं आहे. अभिनेता सुदीप हे दबंग-3मध्ये खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सलमान खानचा दबंग सिनेमा 2010 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी लोकांनी अक्षरश: चुलबुल पांडे पात्र डोक्यावर घेतलं होतं. हा चित्रपट अभिनव कश्यप यांनी दिग्दर्शित केला होता. 2012 रोजी दबंग-2 चित्रपट अरबाज खान यांनी प्रदर्शित केला होता. आता 20 डिसेंबर 2019 रोजी दबंगचा तिसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दबंग फ्रेंचायजीचा तिसरा सिनेमा दबंग-3 चं दिग्दर्शन प्रभूदेवानं केलं आहे. या सिनेमात सलमान खान व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, माही गिल, महेश मांजरेकर आणि नवोदित अभिनेत्री सई मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 16, 2019, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading