ज्या हीरोबरोबर लहानपणी फोटो काढून घेतला, त्याचीच नायिका होणार ही मराठमोळी मुलगी

लहानपणी ज्या हीरोबरोबर फोटो काढून घेतला त्याच्याबरोबर आता त्याचीच नायिका म्हणून पदार्पण करण्याची संधी या मराठमोळ्या मुलीला मिळते आहे. दबंग 3 मधून सलमान कोणाला लाँच करतोय पाहा तिचे फोटो...

  • Share this:

लहानपणी ज्या सुपरस्टारबरोबर उत्साहाने फोटो काढून घेतला, त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं हे मोठं भाग्यच. पण ही फोटोत दिसणारी छोटी फक्त स्क्रीन शेअर करणार नाहीये... ती आता मोठी झाली आहे आणि सलमानच्या 'लव्ह इंटरेस्ट'चं काम करणार आहे.

सलमान खानच्या चित्रपटातून अनेक नव्या नायिकांनी पदार्पण केलं आहे. त्यात अनेक स्टार किड्सही आहेत. सोनाक्षी सिन्हाला 'दबंग'मधून ब्रेक मिळाला होता.

आता दुसरी एक नवी कोरी नायिका दबंग गर्ल म्हणून दिसणार आहे. ती सलमानच्या दबंग 3 मधून पदार्पण करत आहे.

सलमान खानच्या दबंग 3 मधून पदार्पण करणार आहे ही मराठमोळी नायिका - सई मांजरेकर.

सई महेश मांजरेकरचा दबंग 3 हा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. सई सलमानपेक्षा अर्थातच वयाने बरीच लहान असली तरी तिला सलमानच्या 'लव्ह इंटरेस्ट'चं काम करायला मिळणार आहे.

सलमान खानच्या चित्रपटातून अनेक नव्या नायिकांनी पदार्पण केलं आहे. त्यात अनेक स्टार किड्सही आहेत. या वेळी आपला मित्र महेश मांजरेकर यांच्या मुलीला सलमान लाँच करतो आहे.

मग ओरिजिनल दबंग गर्ल - सोनाक्षी सिन्हाचं काय? सोनाक्षी सिन्हा रज्जो - म्हणजे सलमानच्या बायकोचा रोल करणार आहेच. सई मांजरेकर तरुणपणच्या सलमान खानची प्रेयसी म्हणून समोर येणार आहे.

20 डिसेंबर 2019 मध्ये दबंग 3 रीलिज होणार आहे. हिंदीबरोबर तमीळ, तेलुगू आणि कानडी भाषांमध्येही हा सिनेमा रीलिज होणार आहे.

लहानपणी ज्या हीरोबरोबर फोटो काढून घेतला त्याबरोबर आता नायिका म्हणून पदार्पण करण्याची संधी सई महेश मांजरेकरला मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 07:06 PM IST

ताज्या बातम्या