‘दबंग 3’ : विनोद खन्नांच्या जागी ‘हा’ अभिनेता साकारणार सलमानच्या वडिलांची भूमिका Dabangg 3 | Salman Khan | Vinod Khanna

‘दबंग 3’ : विनोद खन्नांच्या जागी ‘हा’ अभिनेता साकारणार सलमानच्या वडिलांची भूमिका Dabangg 3 | Salman Khan | Vinod Khanna

Dabangg 3 | Salman Khan | Vinod Khanna | विनोद खन्ना यांचं निधन झाल्यानंतर ‘दबंग 3’मध्ये सलमानच्या वडिलांची भूमिका कोण साकारणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात होते.

  • Share this:

मुंबई, 28 जून : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाच्या पहिल्या दोन भागांमध्ये अभिनेता विनोद खन्ना यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. मात्र 2017मध्ये विनोद खन्ना यांचं निधन झालं. त्यानंतर ‘दबंग 3’मध्ये सलमानच्या वडीलांची भूमिका कोण साकारणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात होते. पण आता यावरचा पडदा उठला असून ‘दबंग 3’मध्ये सलमानच्या वडिलांची भूमिका कोण साकारणार यांचा खुलासा खुद्द भाईजाननंच केला आहे.

VIDEO: सामना पाहायला गेलेल्या सैफ अली खानचा पाकिस्तानी चाहत्याने उडवली थट्टा

सलमान खाननं नुकताच त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा, दिग्दर्शक प्रभूदेवा दिसत आहे. यासोबत या व्हिडिओमध्ये विनोद खन्ना यांचे भाऊ प्रमोद खन्ना सुद्धा दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सुरुवातीला सलमान खान आणि विनोद खन्ना यांचा एक फोटो दिसतो. त्यानंतर सलमान आणि प्रभूदेवा प्रमोद खन्ना यांची ओळख करून देताना दिसतो.

...म्हणून सुनैनाच्या नात्याला रोशन कुटुंबीयांनी केला विरोध

यावेळी सलमाननं ‘दबंग 3’मध्ये आता विनोद खन्ना यांनी साकारलेली सलमानच्या वडिलांची म्हणजेच प्रजापति पांडे यांची भूमिका आता प्रमोद खन्ना साकारणार आहेत याचा खुलासा केला. विनोद खन्ना आणि प्रमोद खन्ना जवळपास सारखेच दिसतात. त्यामुळे प्रमोद खन्ना यांची निवड या भूमिकेसाठी करण्यात आली आहे.

अभिनेता आदित्य पांचोली विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

 

View this post on Instagram

 

Chulbul is back..... #Dabangg3 @aslisona @arbaazkhanofficial @nikhildwivedi25 @prabhudheva @skfilmsofficial

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

काही दिवसांपूर्वीच सलमाननं ऑफिशिअली ‘दबंग 3’ 2020मध्ये 20 डिसेंबरला रिलीज होणार असल्याचं जाहीर केलं होतं. या सिनेमामध्ये खलनायकाच्या भूमिकेत साऊथ सुपरस्टार सुदीप दिसणार आहे. एप्रिल महिन्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरू झालं असून यातील काही भागाचं शूटिंग मध्य प्रदेशच्या महेश्वरमध्ये झालं आहे. याच ठिकाणी या सिनेमाचं टायटल साँगही शूट करण्यात आलं आहे.

===============================================================

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

First published: June 28, 2019, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading