'दबंग 3'चं पहिलं-वहिलं गाणं रिलीज, Hud Hud Song चा हटके अंदाज

'दबंग 3'चं पहिलं-वहिलं गाणं रिलीज, Hud Hud Song चा हटके अंदाज

सलमान खानचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'दबंग 3'चं पहिलं गाणं 'Hud Hud Song' नुकतंच रिलीज झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : बॉलवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा दबंग 3च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. हा सिनेमा यावर्षी 20 डिसेंबरला रिलीज होत आहे. सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या धमाकेदार अवतारात दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला दिसला. त्यानंतर आता या सिनेमाचं पहिलं गाणं 'Hud Hud Song' नुकतंच रिलीज झालं आहे. टी सीरिजच्या ऑफिशिअल युट्यूबवरून हे गाणं रिलीज करण्यात आलं.

सलमान खाननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन याविषयीची माहिती दिली. सध्या हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. पण हे फक्त ऑडिओ साँग असून याचा व्हिडीओ अद्याप रिलीज झालेला नाही. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांना आता या गाण्याच्या व्हिडीओची रिलीजची उत्सुकता आहे. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान सलमानचे काही फोटो व्हायरल झाले होते.

चक्क अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर, नायकानं दिलं हे उत्तर!

या सिनेमात दबंगमध्ये दिसलेली सलमान आणि सोनाक्षी यांची केमेस्ट्री पुन्हा एकदा दिसणार आहे. मराठी सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. सलमान या सिनेमात ‘पोलिसवाला गुंडा’ झाला आहे. याच बरोबर सलमान या सिनेमात सईसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सलमाननं स्वतः दबंग 3 साठी काही संवाद लिहिले आहेत. तसेच त्याच्या सांगण्यावरून सिनेमाच्या काही डायलॉग्समध्येही बदल करण्यात आले आहेत. सलमान नेहमीच सेटवर इनपुट्स देत असतो. ज्याचा सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये समावेश केला जातो. याशिवाय या सिनेमात तो हाय ऑक्टेन अ‍ॅक्शन सीनच्या कोरिओग्राफीमध्येही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

'..स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे, नेतानिवडीसाठी नाही'

‘दबंग 3’मध्ये सलमान खान व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज खान दिसणार आहेत. हा सिनेमा हिंदी सोबतच तमिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे सलमान स्वतःच या तिन्ही भाषांमध्ये हा सिनेमा डब करणार आहे. हा सिनेमा 20 डिसेंबरला रिलीज होत असून याचं दिग्दर्शन साउथ सुपरस्टार प्रभुदेवा करत आहे. 'दबंग 3' व्यतिरिक्त सलमानकडे 'किक 2' , 'टायगर जिंदा है सिक्वेल', 'नो एंट्री मे एंट्री' आणि 'शेरखान' हे सिनेमा आहेत.

बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्याला करायचाय अक्षय कुमारचा बायोपिक

=========================================================

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

First published: October 31, 2019, 4:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading