मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Daagdi Chaawl 2 trailer: 'चाळ काही विसरत नाही'; डॅडींच्या सिनेमाचा तुफान ट्रेलर आला समोर

Daagdi Chaawl 2 trailer: 'चाळ काही विसरत नाही'; डॅडींच्या सिनेमाचा तुफान ट्रेलर आला समोर

डॅडी आणि सूर्याचं अनोखं नातं दाखवणारा दगडी चाळ 2 चा ट्रेलर सध्या खूप पसंत केला जात आहे.

डॅडी आणि सूर्याचं अनोखं नातं दाखवणारा दगडी चाळ 2 चा ट्रेलर सध्या खूप पसंत केला जात आहे.

डॅडी आणि सूर्याचं अनोखं नातं दाखवणारा दगडी चाळ 2 चा ट्रेलर सध्या खूप पसंत केला जात आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 10 ऑगस्ट: मुंबईतल्या गॅंगवॉरमधील सर्वात मोठं नाव म्हणजे 'अरुण गुलाब गवळी' उर्फ 'डॅडी'. त्यांच्या 'दगडी चाळी'वर आधारित चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. जसं डॅडींनी आजपर्यंत अवघ्या मुंबईवर राज्य केलं तसंच दगडी चाळ या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केलं. आता पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला 'दगडी चाळ 2' सज्ज झाला असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा प्रदर्शित झाला. ‘चुकीला माफी नाही’ हा डॅडींचा डायलॉग सिनेमाच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रिय झाला. डॅडींचा हाच तुफानी अंदाज या सिनेमात सुद्धा बघायला मिळणार आहे. रियल लाईफ डॅडींनी सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण सुद्धा केल्याचं समोर आलं आहे. 'दगडी चाळ 2' मध्ये सूर्या आणि डॅडी यांच्यातील एक वेगळं नातं सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. एकेकाळी डॅडींचा उजवा हात असणारा सूर्या आता त्याच्या कुटुंबासोबत गॅंगवॉरच्या विळख्यातून बाहेर पडून एक साधं सोप्पं आयुष्य जगताना दिसत आहे. मात्र डॅडी आणि सूर्या यांच्यात असं काही घडलं आहे, ज्याने सूर्या डॅडींचा तिरस्कार करू लागला आहे. आता त्यांच्यात नेमकं काय घडलं आहे, त्यांच्या नात्यात कडवटपणा का आला आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. सिनेमाचा ट्रेलर पाहून चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'दगडी चाळ 2' या चित्रपटाच दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केलं असून डॅडींची भूमिका उत्तमरीत्या पेलण्याचं काम मकरंद देशपांडे यांनी केलं आहे. येत्या १९ अॅागस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हे ही वाचा- Myra Vaikul: लिरिक्स माहिती नसताना परीचा शेहनाज गिलच्या गाण्यावर स्वॅग मकरंद देशपांडे यांनी साकारलेली डॅडींची भूमिका खूपच वजनदार असून 'दगडी चाळ 2' हा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर वेगळीच छाप पाडेल असे संकेत मिळत आहेत. या वेळी या चित्रपटात गॅंगवॅारसोबत राजकारणही पाहायला मिळणार आहे. सिनेमात जुन्या अंदाजात असणारी अनेक पात्र आणि काही नवीन पात्र सुद्धा दिसून येणार आहेत.
First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment

पुढील बातम्या