VIDEO : मराठीत येतोय सायबर गुन्ह्यावरचा रहस्यपट, ट्रेलर लाँच

क केअर गुड नाईट, असं तुम्ही अनेकदा बोलत असाल. पण याच नावाचा सिनेमा येतोय. मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला.

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2018 01:47 PM IST

VIDEO : मराठीत येतोय सायबर गुन्ह्यावरचा रहस्यपट, ट्रेलर लाँच

मुंबई, 11 आॅगस्ट : टेक केअर गुड नाईट, असं तुम्ही अनेकदा बोलत असाल. पण याच नावाचा सिनेमा येतोय. मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. अभिनेता सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम झाला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते. या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची आहे. कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना  या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या आई वडीलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात.

हेही वाचा

Birthday Special : मला डेटिंग करायला आवडतं,पण नातं टिकवता येत नाही - जॅकलीन फर्नांडिस

Loading...

अजूनही सैफच्या त्या गाण्यावर हसतो अक्षय कुमार

...तर दीपिकाच्या आजी-माजी बाॅयफ्रेंड्समध्ये पाहायला मिळाली असती टशन

लेखक-दिग्दर्शक गिरीश जोशी सांगतात, ही एक सत्यकथा आहे. त्यांच्या एका नातेवाईकच्या बाबतीत जो प्रसंग त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी  घडला. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात असतात. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येते की, त्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डावरून ऑनलाइन काढले गेले आहे. 'अत्यंत हतबल झालेल्या या नातेवाईकांनी मग मला मदतीसाठी दूरध्वनी केला. मी मग त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी सायबर सेल विभागात घेऊन गेलो. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणामध्ये मला माझ्या काकांच्या बाबतीत घडलेल्या त्या घोटाळ्याबाबत आणखी माहिती मिळत गेली. पण त्याचवेळी संपूर्ण जगात या अशा घोटाळ्यांचे प्रमाण किती मोठे आहे, हे ध्यानात आले.'

हा चित्रपट 31 आॅगस्टला रिलीज होतोय. यात महेश मांजरेकर पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. तर सचिन खेडेकर वडिलांच्या. तगड्या कलाकारांचा हा रहस्यपट नक्कीच अपेक्षा ठेवतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2018 01:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...