सलमान खानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीचा बेली डान्स व्हिडीओ व्हायरल

सलमान खानसोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्रीचा बेली डान्स व्हिडीओ व्हायरल

ही अभिनेत्री बिग बॉस 11ची स्पर्धक असून तिनं सलमान खान सोबत 'जय हो' या सिनेमातही काम केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 07 एप्रिल : अभिनेता सलमान खाननं आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी मदत केली आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री सना खान. सना सध्या जरी बॉलिवूडपासून दूर असली तरी नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये सना बेली डान्स करताना दिसत आहे. सनानं  हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सनाच्या हा व्हिडीओ आतापर्यंत 5 लाख 42,000 लोकांनी पाहिला आहे.

सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळत असलेल्या या व्हिडीओमध्ये सनासोबत कोरिओग्राफर मेलवीनसुद्धा दिसत आहे. सना खाननं बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत 'जय हो' या सिनेमात काम केलं होतं. याशिवाय ती 'वजह तुम हो', 'बंबई गोवा', 'एही है हाय सोसायटी' या बॉलिवूड सिनेमांमध्येही दिसली. तसंच बिग बॉसच्या 11व्या पर्वातली ती स्पर्धक होती. या शोमध्ये ती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेतही राहिली होती. सनानं फक्त बॉलिवूडच नाही तर पाच वेगवेगळ्या भाषांमधील एकूण 14 सिनेमांमध्ये काम केलं आहे.

View this post on Instagram

 

Everything looks perfect when bae styles it ♥️ @melvinlouis #melvinlouis #sanakhan

A post shared by Sana Khaan (@sanakhaan21) on

अभिनयासोबत सनाला नृत्याचीही विशेष आवड आहे. याशिवाय ती मॉडेलिंगही करते. सिनेमांव्यतिरिक्त सनानं 50 पेक्षा अधिक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात करणारी सना खान सलमान खानच्या बिग बॉस 11 व्या पर्वातून प्रकाशझोतात आली. रिअ‍ॅलिटी शो व्यतिरिक्त सनानं आयटम साँगही केलं आहे.

वाचा : ना नरेंद्र मोदी, ना राहुल गांधी... ' हे' बॉलिवूडकर करु शकत नाही कोणालाच मतदान

पाहा : जिद है तो, सब है ! हात नसतानाही केली अफलातून बॉलिंग, VIDEO व्हायरल

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

First published: April 7, 2019, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading