मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शाहरुख खानचं स्वप्न पूर्ण? 'बेटा बॅड बॉय बने', 24 वर्षांपूर्वीच व्यक्त केली होती इच्छा

शाहरुख खानचं स्वप्न पूर्ण? 'बेटा बॅड बॉय बने', 24 वर्षांपूर्वीच व्यक्त केली होती इच्छा

धक्कादायक! किंग खानलाच वाटत होते, 'बेटा बॅड बॉय बने'

धक्कादायक! किंग खानलाच वाटत होते, 'बेटा बॅड बॉय बने'

रेव्ह पार्टी-ड्रग्ज (large quantity of drugs) प्रकरणात बॉलिवुड किंग खानचा मुलगा आर्यन खान(Bollywood actor Shah Rukh Khan's son) याला एनसीबीच्या (NCB) ताब्यात घेण्यात आले आहे. शाहरुखच्या मुलाचा हा कारनामा पाहून त्याच्या अनेक चाहत्यांना त्याचा मुलगा इतका कसा बिघडला असा प्रश्न पडला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 04 ऑक्टोबर: रेव्ह पार्टी-ड्रग्ज (large quantity of drugs) प्रकरणात बॉलिवूड किंग खानचा मुलगा आर्यन खान(Bollywood actor Shah Rukh Khan's son) याला एनसीबीच्या (NCB) ताब्यात घेण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्याने आपण चूक केल्याची कबुलीही एनसीबीला दिली आहे. शाहरुखच्या मुलाचा हा कारनामा पाहून त्याच्या अनेक चाहत्यांना शाहरुख हा बॉलिवुडमधील सक्सेस स्टोरी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शाहरुखने कष्टाने बॉलिवुडमधील आपले स्थान निर्माण केले. मग त्याचा मुलगा इतका कसा बिघडला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे वाचा- आर्यनसोबत असलेला Arbaaz Merchantt कोण व त्याचे सुहाना खानसोबत काय कनेक्शन ?

शाहरुखने 24 वर्षापूर्वी माझी इच्छा आहे की, बेटा बॅड बॉय बने

आर्यन खानचा 1997 साली जन्माला आला तेव्हा दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बेटा बॅड बॉय बने असे विधान केलं होतं. शाहरुखने गौरी खानसोबत सिमी ग्रेवालच्या शोमध्ये हजेरी लावली होती.

या दरम्यान, शाहरुखने गंमतीने म्हटलं होतं की, ज्‍या गोष्‍टी मी तरुणपणी करु शकलो नाही त्‍या गोष्‍टींचा त्‍याने अनुभव घ्‍यावा. शाहरुख म्हणाला होता, 'माझ्या मुलाने मुलींना डेट करायला न्यावं, सेक्स आणि ड्रग्जचाही आनंद घ्यावा. तो एक वाईट मुलगा बनावा आणि जर तो एका चांगल्या मुलासारखा दिसू लागला तर मी त्याला घराबाहेर काढेन. ' असे शाहरुखने आर्यन जन्मला तेव्हा म्हटले होते.

हे वाचा- आर्यन खान अडचणीत, NCB ला दिली कबुली, म्हणाला; मी...

शाहरुखने ही गोष्ट म्हटला असला तरी, सध्या त्याचे हे विधान सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. आज शाहरुख खानचे स्‍वप्‍न पूर्ण झालं का, अशी चर्चा सध्या बॉलिवूडमध्‍ये रंगली आहे.

एनसीबीने (NCB raid) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आलिशान क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. सुमारे 7 तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीनं (NCB) मोठ्या प्रमाणात ड्रग्स (large quantity of drugs) जप्त केली आहेत. एनसीबीनं यात एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने कबूल केले की तो या पार्टीचा भाग होता. त्यानं आपण चूक केल्याची कबुलीही दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यननं ड्रग्सचं सेवन केल्याचंही कबूल केलं आहे.

हे वाचा-  शाहरुखचा मुलगा आर्यन खान NCB च्या ताब्यात, समोर आला पहिला Inside Video

या कारवाईनंतर NCB नं अधिकृत माहिती (Official Statement of NCB) दिली आहे. एनसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, NCB मुंबईच्या अधिकाऱ्यांनी 02.10.2021 रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर छापा टाकला. या ऑपरेशन दरम्यान MDMA/ एक्स्टसी, कोकेन, एमडी (Mephedrone) आणि चरस सारख्या विविध ड्रग्स जप्त करण्यात आले. यात एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. सध्या ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा 94/21 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Aryan khan, Bollywood News, Drugs, Entertainment, Shah Rukh Khan