मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट गीता बसरा झाली किसिंग क्वीन; अशी केली बॉलिवूडमध्ये एंट्री

क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट गीता बसरा झाली किसिंग क्वीन; अशी केली बॉलिवूडमध्ये एंट्री

1984 साली पोर्टस्माउथ (Portsmouth) येथं तिचा जन्म झाला होता. तिचं संपूर्ण शिक्षण विदेशात झालं असलं तरी तिला भारतीय सिनेसृष्टीबाबत प्रचंड आकर्षण होतं.

1984 साली पोर्टस्माउथ (Portsmouth) येथं तिचा जन्म झाला होता. तिचं संपूर्ण शिक्षण विदेशात झालं असलं तरी तिला भारतीय सिनेसृष्टीबाबत प्रचंड आकर्षण होतं.

1984 साली पोर्टस्माउथ (Portsmouth) येथं तिचा जन्म झाला होता. तिचं संपूर्ण शिक्षण विदेशात झालं असलं तरी तिला भारतीय सिनेसृष्टीबाबत प्रचंड आकर्षण होतं.

मुंबई 13 मार्च: गीता बसरा (Geeta Basra) ही कधीकाळी बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. सध्या ती सिनेसृष्टीत सक्रिय नाही मात्र सोशल मीडियाद्वारे ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आज गीताचा वाढदिवस आहे. 37 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 1984 साली पोर्टस्माउथ (Portsmouth) येथं तिचा जन्म झाला होता. तिचं संपूर्ण शिक्षण विदेशात झालं असलं तरी तिला भारतीय सिनेसृष्टीबाबत प्रचंड आकर्षण होतं.

खरं तर गीताला एक क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट (Criminal Psychologist) व्हायचं होतं. एखादा व्यक्ती गुन्हा करण्याआधी काय विचार करतो? त्याची मानसिकता कशी असते? लोक गुन्हा करण्यासाठी का प्रवृत्त होतात? अशा प्रश्नांची उत्तर तिला शोधायची होती. अन् यासाठी तिनं BLS देखील केलं होतं. पण कॉलेजमध्ये असतानाच तिचा कल अभिनयाच्या दिशेने जाऊ लागला. ती रंगभूमीवरील काही प्रायोगिक नाटकांमध्ये भाग घेऊ लागली. परिणामी पाहाता पाहता अभिनयाच्या दिशेने तिचा प्रवास सुरु झाला. अन् त्याच दरम्यान आदित्य दत्त यानं तिला दिल दिया है या चित्रपटाची ऑफर दिली अन् तिच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली.

अवश्य पाहा - अक्षय कुमारला बायकोनं दिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार; घटस्फोट रोखण्याचा दिला कानमंत्र

2006 साली दिल दिया है या चित्रपटातून गीतानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर द ट्रेन, जिल्हा गाझियाबाद, सेकंड हँड हसबंड, लॉक यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली. ट्रेन या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. या चित्रपटात तिनं इमरान हाशमीसोबत केलेल्या किसिंग सीनमुळं तिची लोकप्रियता रातोरात वाढली. हा बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठ्या किसिंग सीनपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यावेळी तिला किसिंग क्वीन म्हणूनही ओळखलं जात होतं. परंतु त्यानंतर तिचे चित्रपट फारसे चालले नाही. त्याच दरम्यान तिनं भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंहसोबत लग्न केलं. सध्या ती सिनेसृष्टीपासून दूर आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Cricket, Harbhajan singh, Wife