Home /News /entertainment /

B'day Special: पहिल्या पत्नीला घटस्फोट ते राज बब्बर यांच्या मुलीशी लग्न, असं आहे 'क्राइम पेट्रोल' सुपरस्टारचं आयुष्य

B'day Special: पहिल्या पत्नीला घटस्फोट ते राज बब्बर यांच्या मुलीशी लग्न, असं आहे 'क्राइम पेट्रोल' सुपरस्टारचं आयुष्य

अभिनेता अनुप सोनी आज आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. याचनिमित्ताने आज आपण त्याच्या आयुष्यातील काही महत्वाचे किस्से जाणून घेणार आहोत.

    मुंबई, 30 जानेवारी: अभिनेता अनूप सोनी (Anup Soni) टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा तर आहेच त्यासोबत त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सोनी टिव्हीवरील प्रसिद्ध शो 'क्राईम पेट्रोल'मधून अनुप सोनी घराघरामध्ये पोहचला. या शोमुळे त्याला वेगळीच ओळख मिळाली. ज्यावेळी अनुप सोनीने या शोला अलविदा केला तेव्हा त्याच्या चाहत्यांनी त्याला पुन्हा शोमध्ये येण्याची मागणी केली. अनुप सोनीचे खासगी आयुष्य देखील तितकेच खास आहे. लग्न झालेले असूनही अनुप सोनी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज बब्बर यांची मुलगी जुही बब्बरच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देत जुहीशी लग्न केले. अनुप सोनी आज आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. याचनिमित्ताने आज आपण त्याच्या आयुष्यातील काही महत्वाचे किस्से जाणून घेणार आहोत. 30 जानेवारी 1975 साली लुधियानामध्ये अनुप सोनीचा जन्म झाला. अभिनयाची आवड असणाऱ्या अनुप सोनीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याने १९९९ साली प्रदर्शित झालेल्या 'गॉडफादर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने 'फिजा', 'दिवानापण', 'खुशी', 'शीन' आणि 'कर्कश' या चित्रपटांमध्ये काम केले. मोठ्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अनुपला सिल्व्हर स्क्रीनवर यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने आपला मोर्चा TV इंडस्ट्रीकडे वळवला. 'क्राईम पेट्रोल', 'सीआयडी', 'बालिका वधू' यासारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये त्याने काम केले. (हे वाचा-PHOTOS: अनिता हसनंदानीने बेबी बम्प दाखवत फॅशनेबल आणि Sexy लुकमध्ये केला फोटोशूट) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तांडव' (Tandav) या वेबसीरिजमध्ये देखील अनुप सोनीने काम केले आहे. या वेबसीरिजमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ऐवढेच नाही तर या वेबसीरिजविरोधात अनेक राज्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनुप सोनी चर्चेत राहिला आहे. अनुप सोनीने दोन लग्न केले आहेत. त्याचे पहिले लग्न ऋतु सोनीसोबत झाले होते. पुण्याच्या सिंबायोसिस युनिव्हर्सिटीतून मॅनेजमेंटची पदवी मिळवलेली ऋतू सध्या एक सॉफ्टवेअर कंपनी चालवते. तिला दोन मुलं आहेत. 2010 मध्ये अनुप आणि ऋतूने घटस्फोट घेतला. (हे वाचा-The White Tiger: जोनस कुटुंबानंतर हृतिक रोशननेही केलं प्रियांंका चोप्राचं कौतुक) अनुप सोनी आणि जुही बब्बर यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, त्यांची भेट एकजुट थिएटर ग्रुपच्या माध्यमातून झाली. दोघेही नादिरा बब्बर यांच्या एका नाटकामध्ये सोबत काम करत होते. याठिकाणीच त्यांना एकमेकांवर प्रेम झालं आणि 2011 मध्ये त्यांनी लग्न केले. हे लग्न खूप साध्या पद्धतीने आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत झाले. अनुप सोनीप्रमाणे जुही बब्बरचे देखील दुसरे लग्न आहे. अनुपच्या आधी जुहीने बिजॉय नांबियारशी लग्न केले होते. लग्नाच्या दोन वर्षांमध्येच त्यांनी घटस्फोट घेतला. अनुप आणि जुहीला एक मुलगा आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Television, Television show

    पुढील बातम्या