मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /क्रिकेटपटू इरफान पठाणचं सिनेसृष्टीत पदार्पण! 'COBRA' सिनेमात साकारणार ही भूमिका

क्रिकेटपटू इरफान पठाणचं सिनेसृष्टीत पदार्पण! 'COBRA' सिनेमात साकारणार ही भूमिका

भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण आता सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. इरफान पठाण (Irfan Pathan) दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रम (Vikram) बरोबर 'कोब्रा' या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण आता सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. इरफान पठाण (Irfan Pathan) दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रम (Vikram) बरोबर 'कोब्रा' या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण आता सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. इरफान पठाण (Irfan Pathan) दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रम (Vikram) बरोबर 'कोब्रा' या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे.

मुंबई, 09 जानेवारी: भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण आता सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. इरफान पठाण (Irfan Pathan) दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रम (Vikram) बरोबर 'कोब्रा' या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे. सेव्हन स्क्रीन स्टुडिओच्या या सिनेमाची निर्मिती ललित कुमार यांनी केली आहे. 2020 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार होता, पण कोरोना पँडेमिकमुळे त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. शनिवारी (09 जानेवारी) या सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाला असून इरफानच्या चाहत्यांमध्ये याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे.

सेव्हन स्क्रीन स्टुडिओने कोब्रा सिनेमाच्या टीजरबाबत एक ट्वीट केले आहे. अजय ज्ञानमुथू यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून हा सिनेमा तमिळ, तेलूगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

टीजरमध्ये इरफानच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते आहे. त्याचा एक नवा अवतार या 1 मिनिट 47 सेकंदाच्या टीजरमध्ये पाहायला मिळतो आहे. त्यामुळे तर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमात विक्रमची भूमिका एका गणितज्ञाची आहे. तर इरफान त्याच्या विरोधात पाहायला मिळतो आहे, त्याची भूमिका एका इंटरपोल ऑफिसरची आहे. त्याच्या भूमिकेच्या वेगवेगळे पैलू या टीजरमध्ये  दिसत आहे. अर्था सर्वांचा लाडका क्रिकेटपटू हिरोशी पंगा घेताना दिसेल, अशी शक्यता आहे.

(हे वाचा-COVID-19 लॉकडाऊनचे नियम तोडण्याचा आरोपांवर 'देसी गर्ल'ने सोडलं मौन, म्हणाली...)

दरम्यान या सिनेमाचं संगीत ए आर रेहमान यांचं असल्याने संगीतप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असणार आहे. या सिनेमातील 'थम्पी थुल्ल' हे गाणं देखील काही दिवसांपूर्वी रीलिज करण्यात आलं होतं. या गाण्याबाबतही चांगल्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

इरफान पठान अलीकडेच क्रिकेटला अलविदा केलं होतं. भारतासाठी इरफानने 29 कसोटी सामने, 120 वनडे मॅच आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. इरफानने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्येही शानदार खेळी केली आहे. आता इरफान त्याच्या आयुष्यातील नवीन इनिंग सुरू करत आहे. त्यामुळे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देत आहेत.

First published: