'विरानुष्का'ची लग्नघटीका समीप पण तारखेवरून 'ट्विस्ट'

'विरानुष्का'ची लग्नघटीका समीप पण तारखेवरून 'ट्विस्ट'

आता दुल्हा, दुल्हन, बाराती आणि भटजी सारे लग्नस्थळी जाऊन पोहोचलेत खरे, मात्र लग्नाचा बार नक्की कधी उडणार याबाबत सस्पेंन्स कायम आहे.

  • Share this:

विराज मुळे, प्रतिनिधी

09 डिसेंबर : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यातील लग्नाचं काऊंटडाऊन एव्हाना सुरू झालंय. मात्र त्यांचं लग्न नक्की कोणत्या दिवशी होणार याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. काही जण ही तारीख १२ डिसेंबर असल्याचं सांगतायत. तर काही जणांना हे लग्न १५ तारखेला होईल असं वाटतंय.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची कुटुंब काल इटलीला रवाना झाली तेंव्हाच हे लग्न इटलीतील मिलान शहरात होणार हे जवळपास स्पष्ट झालं होतं. मात्र तरीही याबाबत विराट किंवा अनुष्का कुणाकडून काहीही नीट सांगण्यात आलेलं नाही. एवढंच काय तर अनुष्कासोबत तीचे कौटुंबिक गुरू हरिद्वारचे महंत अनंत बाबा पाटील हे देखिल इटलीला रवाना झालेत. मात्र या बाबांमुळेच लग्नाची तारीख बदलण्यात आलीय अशी चर्चा सुरू झाली.

विराट आणि अनुष्का यांनी २८ नोव्हेंबरला हरिद्वारला जाऊन या बाबांचे आशिर्वाद घेतले होते आणि तेंव्हाच त्यांनी या दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित केली होती. यानंतर अनुष्काने मुंबईतल्या मॅरेज रजिस्टारकडून १२, १५, १८ आणि २१ अशा चार तारखा लग्नाची नोंदणी करण्यासाठी निवडल्या.

मात्र, विराट अनुष्काच्या लग्नाची खरी तारीख शोधण्यासाठी माध्यमांनी हरिद्वारचा हा आश्रम गाठला, मात्र तेथील सेवकांनी याबाबत आधी काहीही बोलायला नकार दिला. मात्र गुरूजी एका भारतीय लग्नासाठी इटलीला गेले असून १५ तारखेला हे लग्न संपन्न होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे विराट-अनुष्काच्या लग्नाची तारीख बदलली तर नाही ना अशी शंका सगळ्यांच्या मनात निर्माण झाली.

दुसरीकडे अनुष्काचे वडील अजय कुमार शर्मा यांनी त्यांच्या राहत्या सोसायटीतील मित्रांना अनुष्का-विराटच्या मुंबईतील रिसेप्शनचं आमंत्रण देऊ केलंय. त्यासोबतच हे लग्न पुढच्या आठवड्यात होईल असं सांगितलंय. त्यामुळे हे लग्न १२ डिसेंबरलाच होणार असा तर्क सगळ्यांनी काढला.

आता दुल्हा, दुल्हन, बाराती आणि भटजी सारे लग्नस्थळी जाऊन पोहोचलेत खरे, मात्र लग्नाचा बार नक्की कधी उडणार याबाबत सस्पेंन्स कायम आहे. सारं काही ठरवल्याप्रमाणे घडतं की, सिनेमांप्रमाणे अनुष्का-विराटच्या लग्नाच्या कहाणीतही काही ट्विस्ट निघतो याकडे तमाम चाहत्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 06:50 PM IST

ताज्या बातम्या