धोनीच्या या बेस्ट फ्रेंडला जायचंय पाकिस्तानात, इम्रान खान यांना म्हणाली...

धोनीच्या या बेस्ट फ्रेंडला जायचंय पाकिस्तानात, इम्रान खान यांना म्हणाली...

सपना भावनानी एक प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आहे आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची खूप जवळची मैत्रीण आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : महेंद्र सिंह धोनीची जवळची मैत्रीण आणि प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट सपना भावनानी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सपनानं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना उद्देशून केलेल्या एका ट्वीटमुळे सध्या ती सोशल मीडियावर खूपच गाजत आहे. सपनानं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे आपल्या ट्वीटमधून व्हिसाची मागणी केली आहे.

सपनानं आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं, ‘इमरान खान सर मी एक भारतीय डॉक्यूमेंट्री फिल्ममेकर आहे आणि मी सिंधवर ‘सिंधुस्तान’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे. सिंधसाठी माझा व्हिसा दोन वेळा नामंजूर करण्यात आला आहे. पण मी नुकतंच ऐकलं की, तुम्ही खूप वेगळे आहात आणि तुम्हाला शांतता हवी आहे. तर तुम्ही कृपा करून मला आणि माझ्या फिल्मला सिंध येण्यासाठी निमंत्रण पाठवाल का? हे माझं स्वप्न आहे.’

अमृता खानविलकर नंतर 'ही' ठरणार 'खतरों के खिलाडी 10' मधील मोठं सरप्राइझ

सिंधुस्तानच्या ट्विटर पेजनुसार या डॉक्यूमेंट्रीमध्ये भूतकाळतील संस्कृतीच्या व्यापक प्रवासची कथा आहे. ही कथा एका टॅटूच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. सपना भावनानी एक प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आहे आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची खूप जवळची मैत्रीण आहे. अनेकदा ती धोनी आणि साक्षीसोबत दिसते. तसेच धोनीचे सर्व हेअर कट सुद्धा तीच करते. 2016 च्या वर्ल्डकप टी20च्या आधी ती धोनीसोबत एका जाहीरातीत दिसली होती.

अमृता खानविलकरने शेअर केले हॉट फोटो, या कारणासाठी आहे चर्चेत

याशिवाय सपना बिग बॉसच्या 6 व्या सीझनध्येही दिसली होती. त्यावेळी होस्ट सलमान खानसोबत तिचे अनेकदा वादही झाले होते. या शोमधून फायनलच्या एक आठवडा आधी ती घरातून बाहेर पडली होती. तसेच सपनानं ‘प्यार के साइड इफेक्ट’ आणि ‘अगली और पगली’ या सिनेमांध्येही दिसली होती.

'किशोरवयात कुणी स्वतःवर प्रेम करायला शिकवलं असतं तर...' अभिनेत्रीनं व्यक्त खंत

सपनानं फॅशन डिझायनर इंडस्ट्रीमध्ये काम केलं असून लॅक्मे फॅशन वीक कलेक्शनमध्ये ती दिसली होती. याशिवाय तिनं म्यूझिक प्रॉडक्शनमध्येही काम केलं आहे. तसेच सामाजिक कार्यातही तिचा सहभाग असतो. सपना 18 वर्षांची असताना तिच्या वडीलांचं निधन झालं त्यानंतर ती आपल्या काकी सोबत अमेरिकेला गेली. अनेक वर्षांनंतर भारतात परतल्यावर तिनं एका सलूनमध्ये काम करायला सुरूवात केली. त्यानंतर तिनं मॅड ओ वॉट नावानं स्वतःचं प्रॉडक्शन सुरू केलं.

=========================================================

VIDEO: कारगिल विजय दिवस: द्रासमध्ये शहिदांना आदरांजली

Published by: Megha Jethe
First published: July 26, 2019, 10:58 AM IST

ताज्या बातम्या