जेव्हा 18 वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या क्रिकेटरच्या प्रेमात पडली माधुरी दीक्षित

जेव्हा 18 वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या क्रिकेटरच्या प्रेमात पडली माधुरी दीक्षित

माधुरीने त्यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता

  • Share this:

मुंबई, 10 जुलैः बॉलिवूड आणि क्रिकेट हे तसं फार जवळचं नातं आहे. आतापर्यंत अनेक कलाकार आणि खेळाडूंच्या अफेअर्सच्या चर्चा आपण ऐकल्या आहेत. काहींनी या अफेअर्सचे रुपांतर साताजन्माच्या गाठीत केले, तर काहींसाठी ती एफक्त एक आठवणच राहिली. पण तुम्हाला माहित आहे का की, 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितला तिच्याहून 18 वर्षे मोठे असलेले क्रिकेटर आवडले होते.

जेव्हा माधुरीला तो क्रिकेटर आवडू लागा होता तेव्हा तिचे वय फक्त 25 वर्ष होते. तर त्या क्रिकेटरचे वय 43 वर्ष होते. तोपर्यंत क्रिकेटरने निवृत्तीही घेतली होती. आम्ही बोलत आहोत ते म्हणजे सुनील गावस्कर यांच्याबद्दल. सुनील यांचा आज 69 वा वाढदिवस. 1992 मध्ये माधुरी नावारुपास येण्यास सुरूवात झाली होती. तेव्हा 'इंडिया टुडे' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने हे स्पष्ट केले. माधुरी म्हणाली की, 'मला गावस्करच्या मागे धावायचे आहे आणि मी त्यांची स्वप्न पाहते.' एवढंच बोलून माधुरी थांबली नाही. ती पुढे म्हणाली की, 'सुनील फार हॅण्डसम आहेत.' आयपीएल 2018 मध्ये माधुरी आणि गावस्कर यांची भेट झाली. या भेटीचा एक फोटो माधुरीने सोशल मीडियावरही शेअर केला होता.

हेही वाचाः

दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट कर्णधाराने केले त्याच टीमच्या महिला गोलंदाजाशी लग्न

विधानसभेवर नक्षली हल्ल्याची भिती, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत  वाढ

Mumbai Rains: भाजप सरकार मुंबईकरांचा अंत पाहतंय- अजित पवार

First published: July 10, 2018, 2:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading