'सचिनपेक्षा विराट कोहली सर्वोत्कृष्ट फलंदाज', हार्दिक पांड्याने 'कॉफी विथ करण'मध्ये उधळली मुक्ताफळं

'सचिनपेक्षा विराट कोहली सर्वोत्कृष्ट फलंदाज', हार्दिक पांड्याने 'कॉफी विथ करण'मध्ये उधळली मुक्ताफळं

याशिवाय हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला विराट आणि एमएस धोनीमध्ये सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण असाही प्रश्न विचारण्यात आला.

  • Share this:

मुंबई, ०७ जानेवारी २०१९- बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करणमध्ये यावेळी टीम इंडियाचे दोन प्रसिद्ध खेळाडू केएल राहुल आणि हार्दिक पांड्या आले होते. यावेळी दोघांनी मनमोकळेपणाने करणच्या प्रश्नांची उत्तरं दिली. शोदरम्यान दोघांनी इतर सहकाऱ्यांबद्दल सिक्रेट सांगितले की त्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनाही फारसं काही माहीत नसेल. दरम्यान शोमध्ये हार्दिकने सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज असल्याचं सर्वात मोठं वक्तव्य केलं.

करणने रॅपिड फायर राउंडमध्ये दोघांना विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यापैकी सर्वोत्तम फलंदाज कोण असा प्रश्न विचारला असता दोघांनी विराट कोहलीचं नाव घेतलं. राहुलने ‘मी विराट म्हणेन’ असं उत्तर दिलं तर पांड्याने ‘फक्त विराट’ असं उत्तर दिलं.

विराट कोहलीला सचिनपेक्षा सर्वोत्तम फलंदाज म्हटल्यामुळे दोन्ही खेळाडूंवर क्रिकेटचे चाहते कमालिचे रागावले आहेत. सोशल मीडियावर पांड्या आणि राहुल दोघंही तुफान ट्रोल होत आहेत. या दोघांची नावं ट्विटरच्या ट्रेंडमध्येही आली आहेत.

याशिवाय हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला विराट आणि एमएस धोनीमध्ये सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या दोघांनीही धोनीचं नाव घेतलं. पांड्या म्हणाला की, मी धोनी कर्णधार असताना पदार्पण केलं म्हणून माझ्यासाठी तो सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. तर केएल राहुल म्हणाला की, यश मिळवण्याबद्दल बोलायचे झाले तर धोनी सर्वोत्कृष्ट आहे.

VIDEO : राज ठाकरेंनी दिलं बाबासाहेब पुरंदरे यांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण

First Published: Jan 7, 2019 09:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading