ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटरवर, शुटिंग सुरू असतांनाच कोरोनाची लागण

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटरवर, शुटिंग सुरू असतांनाच कोरोनाची लागण

दोन दिवसांपूर्वीच आशालता यांना कोरोनाची लक्षणे दिसून येत होती. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

  • Share this:

किरण मोहिते, सातारा 21 सप्टेंबर:  ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. 'काळूबाईच्या नावाने चांगभलं' या मालिकेचं शुटिंग साताऱ्यात सुरू होतं. तिथे सेटवरच्या 27 लोकांनाही कोरोनाने ग्रासलं आहे. मुंबईवरून आलेल्या एका डान्स ग्रुपमुळे कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

साताऱ्याजवळ असलेल्या वाई जवळच्या हिंगोली या गावात एका फार्म हाऊसमध्ये या मालिकेचं शुटिंग सुरू होत. आशालता या गेली काही दिवस या शुटिंगसाठी तिथेच होत्या.  या मालिकेत एका गाण्याचं शुटिंग सुरू होतं. तिथे मुंबईवरून काही कलाकारांचा ग्रुप आला होता. त्यांच वेळी कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

अलका कुबल या मालिकेच्या निर्मात्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच आशालता यांना कोरोनाची लक्षणे दिसून येत होती. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

कोरोना आहे की नाही 2 तासांत कळणार, स्वदेशी 'फेलुदा' चाचणीला DCGI ची मान्यता

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शुटिंगला परवानगी देण्यात आली होती. सुरक्षेचे सर्व नियम पाळून चित्रिकरण करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. त्यानंतर काही प्रमाणात हे शुटिंग सुरू झालं होतं. या घटनेमुळे शुटिंगदरम्यान  कोरोना नियमांचं पालन करण्यात आलं होतं का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भांगेपासून बनवलं कोरोनावरील औषध; भारतातही होणार ट्रायल?

कुठल्याही चित्रपट किंवा मालिकांसाठी शुटिंग करतांना अनेकांची गरज लागत असते. त्यामुळे तिथे जास्त लोकांचा सहभाग वाढतो. त्यामुळे संसर्गाची भीती असते. शुटिंगआधी सगळ्यांच्या चाचण्या केल्या जाव्यात असंही मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितलं गेलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 21, 2020, 2:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading