मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बहिणीचा हलगर्जीपणा अनन्या पांडेला भोवला; मोबाइल नंबर झाला लीक

बहिणीचा हलगर्जीपणा अनन्या पांडेला भोवला; मोबाइल नंबर झाला लीक

बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) अनन्या पांडेला (Ananya Panday) अलीकडच्या काळात एका विचित्र घटनेला सामोरं जावं लागलं आहे. अनन्याचा मोबाइल नंबर इंटरनेटवर व्हायरल झाल्याने तिला चांगलाचं मनस्ताप झाला आहे.

मुंबई, 19 मार्च: बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) अनन्या पांडेला (Ananya Panday) अलीकडच्या काळात एका विचित्र घटनेला सामोरं जावं लागलं आहे. तिच्या बहिणीने एक शॉर्टफिल्म अपलोड केली होती. ज्यामध्ये तिने अनन्या पांडेचा वैयक्तिक मोबाइल नंबर लीक (Mobile number leak) केला होता. ज्यामुळे अनन्या पांडेला अनेक लोकांनी फोन करून त्रास दिला आहे. त्यामुळे अनन्याला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे.

खरंतर अनन्याच्या एका चुलत बहिणीचं नाव अलाना पांडे (Alanna Panday) असं आहे. जी नुकतीच भारतात येऊन परत गेली आहे. यावेळी अलानाने एक व्लॉग (व्हिडिओ ब्लॉग) शूट केला होता. ज्यामध्ये तिने अनन्या पांडेसोबतचा एक किस्सा शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने आपली बहिण अनन्या पांडेचा मोबाइल नंबर चुकून इंटरनेटवर शेअर केल्याचं देखील सांगितलं आहे. तिच्या या हलगर्जापणामुळे अनेक अज्ञात लोकांनी अनन्याला फोन कॉल केले होते. अलानाने हा व्हिडिओ ब्लॉग अनन्या आणि तिची बहिण रायसा यांच्यासोबत शूट केला होता.

रायसाला फिल्म मेकिंगमध्ये करीयर करण्याची इच्छा आहे. त्यामुळे ती अशी छोटी मोठे व्हिडिओ बनवत असते. एकदा तिने यूट्यूबवर एक शॉर्ट फिल्म अपलोड केली होती, ज्यामध्ये तिच्याकडून चुकून अनन्याची वैयक्तिक माहिती शेअर झाली होती. यावेळी रायसानं सांगितलं की, 'मी अनन्या दीदीचा मोबाइल नंबर चुकून लीक केला होता.

हे ही वाचा -‘…अन्यथा तुम्ही बाहेर फेकले जाल’; कियारानं दाखवली बॉलिवूडची जीवघेणी स्पर्धा

याबाबत अनन्याने सांगितलं की, रायसाने युट्यूबवर एक शॉर्ट फिल्म अपलोड केली होती. ज्यामध्ये माझा मोबाइल नंबर दिसत होता. खंरतर जेव्हा मला अज्ञात लोकांचे फोन कॉल येऊ लागले, तेव्हा मला समजलं नव्हतं की, या लोकांकडे माझा मोबाइल कसा काय गेला? पण जेव्हा रायसाला तिची चूक लक्षात आली. तेव्हा तिने तातडीने संबंधित शॉर्ट फिल्म हटवली. या शॉर्ट फिल्ममधून मोबाइल नंबर हटवल्यानंतर तिने पुन्हा शॉर्ट फिल्म अपलोड केली आहे. खरंतर अनन्या पांडेला चित्रपटात पदार्पण करून फार काळ झालेला नाही. परंतु तिचे सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. ती अलीकडेच  'खाली-पीली' या चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटात ती ईशान खट्टरसोबत मुख्य भूमिकेत दिसली आहे.

First published:

Tags: Ananya panday, Bollywood actress