मुंबई, 02 जानेवारी: अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) मुंबईच्या दिंडोशी दिवाणी कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. बीएमसीच्या (BMC) वतीने असा आरोप केला जात आहे की, कंगना रणौत यांच्या फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम करण्यात आलं होतं, तर कंगनाने न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्या कारवाईवर स्थगिती मागितली होती. या याचिकेबद्दल आज कोर्टात सुनावणी झाली पण कोर्टाने कंगनाची याचिका फेटाळून लावली आहे.
कोर्टात नक्की काय झालं?
कोर्टाने निर्देश दिले आहेत की, कंगनाने मुंबईतील खारच्या घरात जे बांधकाम केलं त्यामध्ये नियमांचं उल्लंघन झालं होतं. यावर कंगनाच्या वकीलांनी असा युक्तिवाद केला की, बीएमसीकडून आलेल्या नोटिशीमध्ये कोणतीही बाब स्पष्टपणे मांडली गेली नव्हती. त्यावर बीएमसीच्या वकिलांनी युक्तिवाद केला कंगना रणौतला 8 पानी नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटिशीमध्ये सरकारकडून सारं काही स्पष्टपणे लिहीण्यात आलं होतं. त्यामुळे कंगना रणौतची स्टे ऑर्डर आणण्याची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. कोर्टाने आपल्या निकालात असंही म्हटलं आहे की या प्रकरणात पुढील चौकशीची आवश्यकता नाही. तसेच कंगनाला पुढील निर्णय घेण्यासाठी 6 आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे.
कोर्टाच्या निर्देशानंतर कंगनाने पुन्हा ट्वीट केलं, ‘बीएमसी मला जाणूनबुजून त्रास देत आहे. याप्रकरणी मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.’
Fake propaganda by Mahavinashkari government, I haven’t joined any flats, whole building is built the same way, one apartment each floor, that’s how I purchased it, @mybmc is only harassing me in the entire building. Will fight in higher court 🙏 https://t.co/4VBEgcVXf3
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 2, 2021
नक्की प्रकरण काय?
सप्टेंबर 2020 मध्ये बीएमसीने कंगनाला नोटीस पाठवली होती. या नोटिशीमध्ये असं लिहीलं होतं. की, ‘खारमधील ज्या इमारतीमध्ये कंगनाचं घर आहे त्या घरामध्ये कंगना रणौतने अवैधरित्या बांधकाम केलं आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC, Kangana ranaut