शाहरुखच्या 'झिरोचा' रिलीज मार्ग मोकळा, काय होती याचिकाकर्त्यांची मागणी?

शाहरुखच्या 'झिरोचा' रिलीज मार्ग मोकळा, काय होती याचिकाकर्त्यांची मागणी?

शाहरुख खानचा झिरो चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकला होता. चित्रपटात आक्षेपार्ह दृष्य असल्याचं याचिकार्त्यांचं म्हणणं होतं. मात्र आता झिरोचा रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 डिसेंबर : शाहरुख खानच्या झिरो चित्रपटाचा रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. आक्षेपार्ह दृष्य चित्रपटातून वगळ्याची मागणी याचिका कर्त्यांनी घेतली होती. ही सर्व आक्षेपार्ह दृष्य चित्रपटातून वगळ्याचं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्यात आल्यानं याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे शाहरुखचा झिरो सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

शाहरूख खानचा आगामी सिनेमा झिरो विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका  दाखल करण्यात आली होती. शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकेत केला होता. अमृतपाल सिंह खालसा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सेन्सॉर बोर्डाला निर्देश देऊन आक्षेपार्ह दृश्य सिनेमातून काढून टाकण्याचे निर्देश देण्याची हायकोर्टाकडे मागणी करण्यात आली होती. ती सर्व दृष्य आता चित्रपटातून काढून टाकण्यात आली आहेत.

काय होतं याचिकाकर्त्यांचं म्हणणं?

त्यांचं म्हणणं असं की, पोस्टरवर शाहरुखनं नोटांचा हार घातलाय आणि कृपाण अडकवलंय. कृपाण शिखांचं धार्मिक चिन्ह आहे. त्याची मस्करी केल्याची भावना त्यांच्यात आहे. डीएसजीपीसीच्या धर्म प्रचार कमिटीचे चेअरमन परमजीत सिंह राणा यांनी पत्रात लिहिलंय, ' शाहरुख खानचं पोस्टर समोर आलंय. त्यात त्याच्या गळ्यात कृपाण आहे. ही मस्करी केलेली दिसतेय.'

येत्या शुक्रवारी 21 डिसेंबरला चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून सिनेमात कतरिना कैफ, अनुष्का शर्मा यांच्यासोबत अनेक दिग्गज मंडळी पाहायला मिळणार आहेत.

First published: December 19, 2018, 12:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading