सलमान खानच्या गाण्यावर कपलनं शेतात केला डान्स, पाहा VIRAL VIDEO

सलमान खानच्या गाण्यावर कपलनं शेतात केला डान्स, पाहा VIRAL VIDEO

सलमान खानच्या गाण्यावर या कपलनं केलेला धम्माल डान्स एकदा पाहाच...

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : सलमान खानचा स्वतःचा असा वेगळा चाहतावर्ग आहे. त्याच्या काही सिनेमांनी बॉलिवूडमध्ये इतिहास घडवला आहे. त्याच्या सिनेमातील गाणं असो वा डान्स आजही त्याची क्रेझ कायम आहे. नुकताच एका कपलनं शेतात सलमानच्या गाण्यावर डान्स केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सलमान खान आणि भाग्यश्रीचा सिनेमा ‘मैने प्यार किया’मधील गाणं दिल दिवानाचा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कपल सलमानच्या, ‘दिल दिवाना...’ डान्स करत आहे. त्यांनी या गाण्यावर त्यांच्याच अंदाजात डान्स केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी सलमान आणि भाग्यश्रीसारखेच कपडे घातले आहेत. रविनानं हा व्हिडीओ पाहिला तेव्हा ती सुद्धा आपलं हसू थांबवू शकली नाही.

'या' कारणासाठी मलायकाशी लग्न करण्याचं टाळतोय अर्जुन कपूर?

या कपलनं शेतात केलेल्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर एवढा व्हायरल झाला की, तो अभिनेत्री रविना टंडन पर्यंत जाऊन पोहोचला. हा व्हिडीओ पाहिल्यावर ती स्वतःला रोखू शकली नाही आणि तिनं हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं लिहिलं, ‘मी सोशल मीडियावर पाहिलेला सर्वात क्यूट व्हिडीओ.’

या व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळात आहेत. अनेक युजर्सनी या कपलचं कौतुक केलं आहे. सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याचा दबंग 3 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेवर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला असून हा सिनेमा येत्या 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

'आई म्हणते शिवी देणं वाईट असतं', स्वरा भास्करनं ट्रोलर्सना सुनावलं

शाहिद कपूर ते आर्यन खान, 'या' भावंडांच्या वयात आहे जास्त अंतर

=================================================

कोळसा खाणीत बिनधास्त फिरतंय अस्वल, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading