मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Maharashtra Unlock: कलाकारांसाठी आनंदाची बातमी, लवकरच शुटिंग होणार सुरु

Maharashtra Unlock: कलाकारांसाठी आनंदाची बातमी, लवकरच शुटिंग होणार सुरु

अनलॉक(Unlock) च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगराचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच शुटींग सुरु होईल ही आशा मालिकांच्या दिग्दर्शकांना मिळाली आहे.

अनलॉक(Unlock) च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगराचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच शुटींग सुरु होईल ही आशा मालिकांच्या दिग्दर्शकांना मिळाली आहे.

अनलॉक(Unlock) च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगराचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच शुटींग सुरु होईल ही आशा मालिकांच्या दिग्दर्शकांना मिळाली आहे.

मुंबई, 3 जून:  राज्यात आज अनलॉकबद्दलची (Unlock)  मोठी घोषणा करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनलॉकबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात अनलॉक, लॉकडाऊन संदर्भात 5 टप्प्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.  अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगराचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच शुटींग सुरु होईल ही आशा मालिकांच्या दिग्दर्शकांना मिळाली आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं होतं. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत होती. तर दुसरीकडे मृतांचा आकडा वाढत होता. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अत्यावशक सेवा वगळता इतर सर्व सेवा सेवा बंद करण्यात आल्या होत्या. यामध्ये शुटींगवर सुद्धा बंदी आली होती. त्यामुळे मुंबईमध्ये सुरु असणाऱ्या कित्येक मालिकांना शुटींगसाठी परराज्यात आपलं बस्तान मांडावं लागलं होतं.

(हे वाचा: कोरोनामुक्त होताच 10 हजार किलोमीटर धावले मिलिंद सोमण, पाहा PHOTO)

मात्र परराज्यात काही दिवस शुटींग केल्यानंतर तिथेही काही मालिकांवर बंदी आली होती. म्हणूनच कित्येक मालिकांचं शुटींग बंद होतं. त्यामुळे सर्वच कलाकार चिंतेत होते. मात्र आज एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने 5 टप्प्यांत अनलॉकचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात  5 टप्प्यांत अनलॉक केलं जाणार आहे.

(हे वाचा:'तब्बल 15 दिवस उपाशीपोटी राहिलो'; मिर्झापूरच्या दद्धा त्यागींचा संघर्ष  )

यातील 2 ऱ्या टप्प्यात मुंबई शहर आणि उपशहराचा समावेश आहे. त्यामुळे अनलॉक झाल्यानंतर शुटींगवरचे निर्बंधसुद्धा हटवण्यात येणार आहेत. आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई शहर आणि उपनगरमध्येचं अनेक मालिकांचं शुटींग चालत. त्यामुळे मालिकांना नक्कीच दिलासा मिळणार असल्याचं दिसत आहे.

First published:

Tags: Entertainment, Lockdown, Mumbai