• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • तारक मेहताला पुन्हा एकदा कोरोनाचा फटका; भीडे गुरुजींनंतर आणखी 4 जण पॉझिटिव्ह

तारक मेहताला पुन्हा एकदा कोरोनाचा फटका; भीडे गुरुजींनंतर आणखी 4 जण पॉझिटिव्ह

या मालिकेत काम करणाऱ्या चार कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. (Coronavirus positive) सध्या घरातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 • Share this:
  मुंबई 16 एप्रिल: कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान कोरोनाचा कहर आता तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka ooltah chashmah) या मालिकेतही पाहायला मिळत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या चार कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. (Coronavirus positive) सध्या घरातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमानुसार मालिकेच्या सेटवर कोरोना चाचणी करणं बंधनकार आहे. यामुळं अगदी बॅकस्टेज आर्टिस्ट पासून पडद्यावर झळकणाऱ्या कलाकारांपर्यंत सर्वांना ही टेस्ट करावी लागते. त्यामुळं तारक मेहताच्या सेटवर 110 जणांची चाचणी घेण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी चार जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. या रिपोर्टमुळं सध्या सेटवर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या कलाकारांची नाव निर्मात्यांनी जाहीर केलेली नाहीत. मात्र यापुर्वी मंदार चांदवडेकर आणि मयुर वकानी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळं मालिकेचं चित्रीकरण पुन्हा एकदा थांबवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अवश्य पाहा - या उत्तरामुळं लारा दत्ता होती ‘मिस युनिव्हर्स’; उत्तर ऐकून परीक्षकही पडले सुन्न महाराष्ट्रातील कोरोनास्थिती चिंताजनक महाराष्ट्रात कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या दैनंदिन रुग्णवाढीबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून तातडीने नमुना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट टळलेले नसून कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, हे महाराष्ट्रातील स्थितीवरून स्पष्ट होते. त्यामुळे अन्य राज्यांनीही दक्ष राहावे, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी दिला.
  Published by:Mandar Gurav
  First published: