पडदे लावलेल्या बाथरूममध्ये अंघोळीला गेली अभिनेत्री, शेअर केला VIDEO

पडदे लावलेल्या बाथरूममध्ये अंघोळीला गेली अभिनेत्री, शेअर केला VIDEO

लॉकडाउन सुरू होण्याआधी फिरायला म्हणून अभिनेत्री तिच्या गावी गेली होती. तेव्हा अचानक लॉकडाउनची घोषणा झाली आणि ती तिथेच अडकली.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : लॉकडाउनमध्ये देशात सगळेच लोक घरामध्ये अडकून पडले आहेत. सर्वसामान्य नागरिकच नाही तर दिग्गज आणि नामवंत व्यक्ती, कलाकार मंडळी, खेळाडू हेसुद्धा घरातच आहेत. सध्या एक टीव्ही कलाकार एका अशा गावामध्ये अडकली आहे जिथं तिला हव्या तशा सोयीसुविधांची कमतरता आहे. गावात टीव्ही नाही, अंघोळीसाठी बाथरूम नसल्याचंही तिनं म्हटलं आहे. अभिनेत्री रतन राजपूत हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

लॉकडाउन सुरू होण्याआधी फिरायला म्हणून अभिनेत्री तिच्या गावी गेली होती. तेव्हा अचानक लॉकडाउनची घोषणा झाली आणि ती तिथेच अडकली. मोदींनी 24 मार्चला रात्री 8 वाजता 21 दिवसांचं लॉकडाउन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर अभिनेत्रीला त्या गावातून बाहेर पडता आलं नाही. आता 10 दिवसानंतर तिने सोशल मीडियावर अनुभव सांगितला.

रतन राजपूत ज्या गावची आहे तिथं सोयीसुविधा कमी आहेत. ती फक्त फोन आणि इंटरनेटवरच वेळ घालवत आहे. अभिनय क्षेत्रात काम कऱणारी ही अभिनेत्री आता टीव्हीपासून दूर आहे. सोशल मीडियावर तिने बाथरूमची अवस्थाही दाखवली आहे. त्यात खिडकीला एका कापडी पडद्यानं झाकलं आहे. तसंच कपडे धुत असलेलंही दाखवलं आहे.

मोदींनी लॉकडाउनची घोषणा करताच घरातून पळत जाऊन सिलिंडर भरून आणावं लागलं. कारण नंतर ते मिळेल की नाही याची खात्री नव्हती. मला माझ्या अडचणी सांगायच्या म्हणून शेअर करत नाही तर अशा परिस्थितही लॉकडाउनचं पालन करत आहे यासाठी व्हिडिओ करत आहे.

हे वाचा : हार्दिकच्या घरात कैद नताशा झाली 'अस्वस्थ', शेअर केले बिकिनीमधले हॉट फोटो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2020 11:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading