• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • बॉलिवूडकरांवर COVID-19चं सावट; कार्तिक आर्यनही कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूडकरांवर COVID-19चं सावट; कार्तिक आर्यनही कोरोना पॉझिटिव्ह

Corona in bollywood: रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, सतीश कौशिक यांच्यासह अनेक कलाकारांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. आता बॉलिवूडचा चॉकलेट हिरो कार्तिक आर्यनही (Kartik Aaryan) कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे

 • Share this:
  मुंबई, 22 मार्च: बॉलिवूडच्या कलाकारांवर कोरोना विषाणूचा विळखा (Corona virus infection) वाढतचं चालला आहे. एका पाठोपाठ एक कलाकार कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत. रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, सतीश कौशिक यांच्यासह अनेक कलाकारांना आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आता यामध्ये आणखी भर पडली आहे. बॉलिवूडचा चॉकलेट हिरो कार्तिक आर्यनलाही (Kartik Aaryan tested corona positive) कोरोना विषाणूची लागण (corona Positive) झाली आहे. याबाबतची माहिती कार्तिकनं स्वत: आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. त्याने कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती देताना, इन्स्टाग्रामवर लिहिलं की, 'कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, प्रार्थना करा' यासोबतचं कार्तिकनं बीग प्लस चिन्हाचा फोटोही शेअर केला आहे. त्याने या पोस्टच्या माध्यमातून कोरोनातून बरा होण्यासाठी चाहत्यांना प्रार्थना करण्यास सांगितली आहे. कार्तिकच्या या पोस्टवर त्याचे असंख्य चाहते आणि इंडस्ट्रीतील लोकं त्याच्या रिकव्हिटीसाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यन लॅक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर मनीष मल्होत्रासाठी वॉक करताना दिसला आहे. त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील रॅम्प वॉक करताना दिसली आहे. त्यामुळे बॉलिवूडचे इतर कलाकारही कोरोनाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘भूल भुलैय्या 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात  व्यग्र आहे. पण आता त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे पुढील काही काळ या चित्रपटाचं शूटिंग थांबवलं जाऊ शकतं. हे ही वाचा- कार्तिकचा 'रोज डे' झाला खास, गुडघ्यावर बसून घेतलं गुलाब; VIDEO VIRAL कार्तिक आर्यनची कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या आगामी चित्रपटांना याचा फटका बसू शकतो. कार्तिककडे सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत. यामध्ये 'धमाका', 'भूल भुलैय्या 2', 'दोस्ताना 2' अशा बड्या चित्रपटांचा समावेश आहे. अलीकडेच त्याने 'भूल भुलैय्या 2' च्या सेटवरून तब्बू आणि कियारा अडवाणीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ते सर्वजण मास्क परिधान केलेले दिसले होते. याशिवाय पुढील आठवड्यापासून कार्तिकला जान्हवी कपूरसोबत 'दोस्ताना 2' या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करायची होती. त्यामुळं या चित्रपटाचं वेळापत्रकही लांबण्याची शक्यता आहे.
  Published by:News18 Desk
  First published: