Home /News /entertainment /

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यापासून Esha Gupta ने बोल्डनेसची सीमा केली पार; ब्रालेस फोटोशुटनंतर बेडरूमधील टॉपलेस Photo केला शेअर

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यापासून Esha Gupta ने बोल्डनेसची सीमा केली पार; ब्रालेस फोटोशुटनंतर बेडरूमधील टॉपलेस Photo केला शेअर

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) काही दिवासापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मात्र याहीपेक्षा ती सध्या तिच्या बोल्ड फोटोशुटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

    मुंबई, 15 जानेवारी - बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) काही दिवासापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मात्र याहीपेक्षा ती सध्या तिच्या बोल्ड फोटोशुटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ईशा गुप्ता नेहमीच तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. तिचं प्रत्येक फोटोशुट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतं. सध्या ईशा कोरोना झाल्यामुळे घरात क्वारंटाइन आहे व योग्य ती काळजी घेत आहे. मात्र तिचं क्वारंटाइनमधलं टॉपलेस फोटोशुट सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशुट चर्चेत ईशानं (Esha Gupta Bold Photos) तिच्या इन्स्टावर तिचा बेडरूममधील टॉपलेस फोटो शेअर केला आहे. तिनं हा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, 'द फोटोग्राफ.' फोटोत ईशा बेडवर टॉपलेस लुकमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

    वाचा-Trolling नंतर नवीन गाणं रिलीज होताच गोविंदानं केला कमेंट सेक्शन ऑफ! यापूर्वी ब्रालेस फोटो शेअर करत आली होती चर्चेत ईशाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आपल्या सोफ्यावर बसून विविध पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ईशा गुप्ताने फक्त पांढरा शर्ट परिधान केला होता. असे ब्रालेस फोटो शेअर करत ईशाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. ईशाने विविध पोज देत हे बोल्ड फोटोशुट केलं होतं.
    View this post on Instagram

    A post shared by Esha Gupta (@egupta)

    ईशा गुप्ताने तिच्या करिअरची सुरूवात 2012 मध्ये आलेल्या 'जन्नत 2' या सिनेमातून केली होती. या सिनेमात तिच्यासोबत इमरान हाशमी प्रमुख भूमिकेत होता., या चित्रपटानंतर ईशा 'राझ 3 डी', 'चक्रव्यूह', 'गोरी तेरे प्यार में', 'हमशकल्स', 'बेबी', 'मैं राहूं या ना राहूं', 'रुस्तम', 'कमांडो 2', 'बादशाहो'. 'पलटन' आणि 'टोटल धमाल' या चित्रपटात दिसली. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटातील तिच्या बोल्ड लुक आणि किसिंग सीनमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. यासोबतच ईशा गुप्ता 'आश्रम 3' वेब सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत दिसणार आहे. 'आश्रम' वेब सीरिजचे दोन्ही भाग हिट ठरले आहेत. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचा बॉयफ्रेंड Manuel Campos Guallar याच्यासोबतचे काही फोटो शेअर करत असते. .
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या